Gautam Gambhir : या प्रश्नाचं उत्तरच नाही... गंभीर पांड्याच्या कॅप्टन्सीवर जाम भडकला

Gautam Gambhir Criticize Hardik Pandya
Gautam Gambhir Criticize Hardik Pandya esakal
Updated on

Gautam Gambhir Criticize Hardik Pandya : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर उमरान मलिकच्या ऐवजी युझवेंद्र चहलला संधी दिली. युझवेंद्र चहलने देखील कर्णधार हार्दिक पांड्याला फिन एलनची महत्वाची विकेट काढून दिली. तरी देखील भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक गौतम गंभीरने हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर टीका केली आहे. गौतम गंभीर म्हणाला की, मला पांड्याने सामन्यात घेतलेल्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का बसला.

Gautam Gambhir Criticize Hardik Pandya
IND vs NZ: दोष कोणाचा शिक्षा कोणाला? मॅचच्या आधी यांच्यामुळे बदलली खेळपट्टी अन् क्युरेटरची झाली हकालपट्टी

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मी या प्रश्नाचा उत्तर देऊ शकत नाही. अशा खेळपट्टीवर पांड्याने हा निर्णय घेतला. युझवेंद्र चहल हा टी 20 फॉरमॅटमधील तुमचा एक नंबरचा गोलंदाज आहे. त्याने फिन एलनची विकेट घेऊन देखील त्याला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फक्त 2 षटके देणे, त्याचा बॉलिंग कोटा देखील पूर्ण न करू देणे या निर्णयाचे काही लॉजिक समजले नाही.'

गंभीरने अर्शदीप आणि शिवम मावी सारख्या युवा खेळाडूंना संधी देण्याशी सहमती दर्शवली. मात्र युझवेंद्र चहलकडून त्याचे बॉलिंग कोटा पूर्ण करून घेणेही आवश्यक होते असे मत व्यक्त केले. न्यूझीलंडला 80 ते 85 धावात गुंडाळता आले असते. विशेष म्हणजे हार्दिक पांज्याने दीपक हुड्डाची 4 षटके पूर्ण करून घेतली.

Gautam Gambhir Criticize Hardik Pandya
Pakistan Team: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन कोच! पाकिस्तानने का घेतला हा विचित्र निर्णय?

याबाबत गंभीर म्हणाला की, 'होय तुम्ही अर्शदीप सिंग किंवा शिवम मावी यासारख्या युवा खेळाडूंना अजून एक संधी देताय मात्र तुम्ही युझवेंद्र चहलला देखील शेवटचे षटक टाकू द्यायला हवे होते. त्यामुळे हार्दिक पांड्याने इथे चूक केल्याचे मला वाटते. तो या खेळपट्टीवर न्यूझीलंडला 80 ते 85 धावात गुंडळू शकला असता. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला संधी देऊ शकत नाही. हार्दिकने दीपक हुड्डाकडून 4 षटके टाकून घेतली मात्र चहलकडून नाही याचे मोठे आश्चर्य वाटत आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.