Gautam Gambhir : मानधनापेक्षा सहाय्यक प्रशिक्षक निवडण्यावर गंभीर यांचा भर

गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली; परंतु त्यांना किती मानधन मिळणार हे अजून निश्चित झालेले नाही. सध्या तरी आपल्या सहाय्यक प्रशिक्षकांची टीम निवडण्यावर गंभीर यांचा भर आहे.
Gautam Gambhir focusing on head coach of the Indian team not the payment he received
Gautam Gambhir focusing on head coach of the Indian team not the payment he receivedSakal
Updated on

नवी दिल्ली : गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली; परंतु त्यांना किती मानधन मिळणार हे अजून निश्चित झालेले नाही. सध्या तरी आपल्या सहाय्यक प्रशिक्षकांची टीम निवडण्यावर गंभीर यांचा भर आहे.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसह राहुल द्रविड निवृत्त होणार आणि त्या ठिकाणी गंभीर यांची निवड होणार हे निश्चित झाले होते. काल बीसीसीआयकडून त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांना देण्यात आलेलेच मानधन गंभीर यांनाही मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

गंभीरसाठी मानधन महत्त्वाचे नाही. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेण्याअगोदर सहाय्यक प्रशिक्षक नियुक्त करणे हे त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमाचे आहे, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. २०१४ मध्ये डंकन फ्लेचर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते त्यावेळी रवी शास्त्री यांची संघ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यावेळीही लगेचच करार करण्यात आला नव्हता.

संघ हितासाठी शास्त्री यांनी तातडीने सूत्रे स्वीकारली होती. गंभीर यांच्याबाबतीतही आता असेच घडत आहे; परंतु द्रविड यांना देण्यात येणारे मानधन गंभीर यांना देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

रोडमॅप तयार करणार

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. ते मायदेशी परतल्यानंतर गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्याशी एकत्रित बैठक घेऊन पुढील रोडमॅप तयार करण्यात येणार आहे.

अभिषेक नायर सपोर्ट स्टाफमध्ये

गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमधील टीममध्ये कोणकोण असणार याची उत्सुकता आहे. मुंबईकर अभिषेक नायर यांची फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक आहे. नायर हे कोलकता नाईट रायडर्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.

त्यांनी गंभीरसोबत ही जबाबदारी सांभाळलेली आहे. विशेष म्हणजे नायर मुंबईचे असल्यामुळे त्यांची रोहित शर्मासह अधिक चांगली मैत्री आहे. गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी झहीर खान आणि बालाजी यांची नावे पुढे येत आहे; परंतु विनय कुमार यांच्यासाठी गंभीर आग्रही असल्याचे समजते. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी टी. दिलीप यांचे स्थान कायम राहाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.