Gautam Gambhir : आपल्या वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नवे विधान समोर आले आहे. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्यावर गंभीर संतापला आहे. गंभीरने वर्ल्ड कप दरम्यान राहुल द्रविडच्या कार्यकाळाचे कौतुक खुप करत होता. आणि मग त्याने रोहित शर्माला घेरले.
खरंतर मायदेशात वर्ल्ड कप जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. रोहित शर्मासह संपूर्ण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे स्वप्नही अधुरे राहिले. पण रोहितने वर्ल्ड कपदरम्यान सांगितले होते की, मला आणि इतर खेळाडूंना द्रविडसाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. रोहित शर्माचे हे वक्तव्य माजी सलामीवीर गौतम गंभीरला आवडले नाही.
खेळाडूने देशासाठी प्रथम वर्ल्ड कप जिंकला पाहिजे, असे गंभीरचे म्हणणे आहे. गंभीर स्पोर्ट्सकीडावर बोलताना म्हणाला की, 'प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक कोचला वर्ल्ड कप जिंकायचा असतो. पण असे का घडते हे मला अजूनही समजले नाही. 2011 मध्येही हा प्रकार घडला होता. एका व्यक्तीने वर्ल्ड कप जिंकावा असे तुम्ही म्हणता ते चुकीचे आहे.
तो पुढे म्हणाला, 'तुम्ही देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एका व्यक्तीसाठी वर्ल्डकप जिंकायचा असले तरी तसं मीडियाशी बोलू नका आणि स्वतःकडे ठेवा. सत्य हे आहे की वर्ल्ड कप जिंकणे देशासाठी महत्त्वाचे आहे. हा प्रश्न मला 2011 मध्ये देखील विचारण्यात आला होता, तेव्हा मी म्हणालो की नाही, मला माझ्या देशासाठी हे करायचे आहे. मी बॅट उचलून देशासाठी बॅटिंग करतो.
यापूर्वी गौतम गंभीरनेही त्याचा सहकारी मोहम्मद कैफचे विधान चुकीचे असल्याचे फेटाळून लावले होते. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन झाला तेव्हा आपले मत मांडताना कैफ म्हणाला होता की, या स्पर्धेतील सर्वोत्तम संघाने वर्ल्ड कप जिंकलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.