Gautam Gambhir : 'अरे स्लेजर्स... नियम कायदे फक्त आमच्यापुरते' गंभीर पुन्हा भडकला, आता निशाणा कोणावर?

गौतम गंभीरने आपल्या एका ट्विटने सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ म्हणाला...
Gautam Gambhir
Gautam Gambhir
Updated on

Gautam Gambhir : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने आपल्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गंभीरला ऑस्ट्रेलियन संघाचे हे कृत्य अजिबात आवडले नाही. यासाठी त्याने ऑस्ट्रेलियन संघाचा चांगलाच समाचार घेतला.

Gautam Gambhir
Ashes 2023: सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! दिग्गज खेळाडू अ‍ॅशेसमधून बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियन संघाला विचारले की, खिलाडूवृत्तीचे लॉजिक तुम्हाला लागू होते की ते फक्त भारतीयांनाच लागू होते. अॅशेस मालिकेअंतर्गत लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या विकेटवरून खळबळ उडाली. यावरून क्रिकेट विश्व दोन गटात विभागलेले दिसते. ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना 43 धावांनी जिंकला. यासह पाहुण्या कांगारू संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

Gautam Gambhir
Ashes : आता क्रिकेटमध्ये होणार बंड? रनआऊटच्या निर्णयावर राडा... अश्विनने देखील घेतली उडी

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या 52 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनने बेअरस्टोसमोर शॉर्ट लेन्थ चेंडू फेकली. बेअरस्टोने वाकून हा चेंडू सहज सोडला. यानंतर चेंडू यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीकडे पोहोचला, ज्याने त्याचा झेल घेतला आणि तो स्टंपवर फेकला. त्यावेळी बेअरस्टो क्रीझच्या पुढे गेला होता.

यानंतर कॅरीसह कांगारू खेळाडूंनी बेअरस्टोविरुद्ध अपील केले आणि अंपायरने त्याला बाद घोषित केले. कॅरीने बेअरस्टोला ज्या पद्धतीने बाद केले, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक लोक याला खेळाच्या भावनेविरुद्ध मानत आहेत. गौतम गंभीरही यावर खूश नाही.

गौतम गंभीरने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले, 'अरे स्लेजर्स... खेळाच्या भावनेचा तर्क तुम्हाला लागू होतो की फक्त भारतीयांसाठी?'.

Gautam Gambhir
West Indies WC 2023 : पाकिस्तानच्या हातात किल्ली! वेस्ट इंडिजसाठी वर्ल्ड कपचं उघडणार दरवाजे

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना 6 जुलैपासून हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. 371 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ एकवेळ जिंकेल असे वाटत होते, पण कर्णधार बेन स्टोक्स बाद होताच सर्व काही बदलले. स्टोक्स 155 धावा करून बाद झाला. दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन डकेटने 83 धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी 3-3 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()