Gautam Gambhir on Shreyas Iyer
Gautam Gambhir on Shreyas Iyer

Gautam Gambhir on Shreyas Iyer : 'NCA मध्ये तो काय करत होता, मोठा प्रश्न...', गौतमची श्रेयस अय्यरबाबत 'गंभीर' प्रतिक्रिया

Published on

Gautam Gambhir questions Shreyas Iyer : आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावून टीम इंडियाने वर्ल्डकप 2023आधी प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कपच्या 16 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्स राखून पराभव केला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ केवळ 50 धावा करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न घेता 37 चेंडूत लक्ष्य गाठले. रोहितने कर्णधार म्हणून दुसऱ्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले.

पण टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आशिया कप 2023 मध्ये पहिले दोन सामने खेळला. पाकिस्तानविरुद्ध सुपर फोर मध्ये मैदानात उतरण्यासाठी तो सज्ज होता. यादरम्यान तो जखमी झाला आणि अखेरच्या क्षणी केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला. यानंतर पुढील चार सामन्यांत तो खेळला नाही. कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, श्रेयस 99 टक्के फिट आहे.

Gautam Gambhir on Shreyas Iyer
Ind Vs Aus: ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूंना मिळणार विश्रांती?

दरम्यान, टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने श्रेयस अय्यरच्या वर्ल्डकप संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रेयस अय्यरबद्दल गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सला म्हणाला, 'ही चिंतेची बाब आहे. तो इतक्या दिवसापासून बाहेर आहे आणि नंतर थेट आशिया कपसाठी संघात परत आला, एक सामना खेळा आणि परत अनफिट झाला. मला वाटत नाही की यानंतर संघ व्यवस्थापन एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याची निवड करेल. कारण तुम्ही नेहमी तंदुरुस्त खेळाडूंसोबत वर्ल्डकपला जायला हवे.

Gautam Gambhir on Shreyas Iyer
Ind Vs Aus: ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूंना मिळणार विश्रांती?

गौतम गंभीर म्हणाला की, प्रदर्शन ही वेगळी गोष्ट आहे. कल्पना करा की एखादा खेळाडू क्रॅम्प्स किंवा इतर कशाने त्रस्त असेल तर ऐनवेळी वर्ल्डकप संघात बदली खेळाडू मिळणार नाही. त्यामुळे जर अय्यर या स्पर्धेसाठी दुखापतीमुळे तंदुरुस्त नसेल तर हे खूप कठीण आहे आणि तेव्हा त्याचा सध्याचा फॉर्म कसा आहे हे आम्हाला माहित नाही.

गौतम गंभीर पुढे म्हणाला, 'त्याचा कसाही फॉर्म असला तरी तो 7-8 महिन्यांपूर्वीचा होता, त्यानंतर तो फक्त एकच सामना खेळला आहे. त्यामुळे हे दुर्दैवी आहे. प्रश्न विचारायचे असतील तर NCA ला विचारा कारण तो इतके महिने तिथे होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.