Gautam Gambhir : भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीची ती बाचाबाची नक्की आठवते. आज (दि. 14) नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे वर्ल्डकप 2023 ची सर्वात हाय व्होल्टेज मॅच भारत - पाकिस्तान मॅच होत आहे.
विशेष म्हणजे आजच गौतम गंभीरचा देखील वाढ दिवस आहे. गौतम गंभीर आता जरी मैदानावर उतरणार नसला तरी तो समालोचन कक्षातून तो या सामन्याचं विश्लेषण करणार आहे. दरम्यान, त्याने या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत असताना गौतम गंभीरने 'तुमच्या संघाला पाठिंबा द्या मात्र पाहुण्यांशी वाईट वर्तणूक करून नका. शेवटती ते आपले पाहुणे आहेत. आपणाला हे लक्षात राहिलं पाहिजे की ते आपल्या इथे वर्ल्डकप खेळण्यासाठी आले आहेत.'
भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर निळा समुद्र अवतरला आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना व्हिसा मिळाला नसल्याने त्यांची उपस्थितीत नगण्य आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल झाला असून इशान किशनच्या ऐवजी संघात शुभमन गिलचा समावेश करण्यात आला आहे.
प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानला दोन धक्के दिले असून मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्याने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. आता बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही अनुभवी जोडी मैदानावर असून त्यांनी पाकिस्तानला 20 षटकात 2 बाद 103 धावांपर्यंत पोहचवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.