Gautam Gambhir KL Rahul : IPL मधील गट्टी! सडेतोड गौतम गंभीरची रोहितचे उदारहण देत राहुलसाठी जोरदार बॅटिंग

Gautam Gambhir KL Rahul
Gautam Gambhir KL Rahulesakal
Updated on

Gautam Gambhir KL Rahul : भारताचा माजी उपकर्णधार केएल राहुलने गेल्या 10 कसोटी डावात 12.5 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात त्याला एकदाही 25 धावांच्या वर धावा करता आलेल्या नाहीत. यामुळे केएल राहुलला भारतीय कसोटी संघातून डच्चू देण्यात यावा यासाठी माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि इतर खेळाडूंनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

Gautam Gambhir KL Rahul
MCC : नॉन स्ट्रायकर रन आऊट करणाऱ्या गोलंदाजांची बदनामी करणाऱ्यांना MCC ची सणसणीत चपराक

मात्र केएल राहुलच्या समर्थनात देखील अनेक माजी क्रिकेटपटू मैदानात येत असून आकाश चोप्रानंतर आता लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरने देखील केएल राहुलसाठी शड्डू ठोकला. गौतम गंभीर म्हणाला की, 'केएल राहुलला भारतीय संघातून वगळले जाऊ नये. कोणी त्याला एकाकी पाडू नये. प्रत्येकजण बॅड पॅचमधून जातो. कोणीही, कोणत्याही क्रिकेट पंडिताने तो चांगली कामगिरी करत नाहीये त्याला वगळलं पाहिजे असं सांगू नये.'

गौतम गंभीरने यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे उदाहरण दिले. संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला म्हणूनच तो कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकला. गंभीर म्हणाला,

'ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही राहिले पाहिजे. रोहित शर्माकडेच बघा, तो देखील खराब फॉर्ममध्ये होता. त्याची कारकिर्दिची सुरूवात पहा. त्याची फलंदाजी देखील उशिराच फुलू लागली. आधीच्या तुलने आता तो कशी कामगिरी करतोय पहा. प्रत्येकाने त्याची गुणवत्ता पाहिली आणि त्याला पाठिंबा दिला. त्याची फळं तुमच्यासमोर आहेत. राहुलच्या बाबतीतही असंच होऊ शकतं.'

Gautam Gambhir KL Rahul
IND vs AUS 3rd Test Pat Cummins : तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वात मोठा बदल, कमिन्सऐवजी...

गौतम गंभीरने भारत मालिकेत 2 - 0 ने आघाडीवर आहे 2 - 0 ने पिछाडीवर नाही. त्यामुळे कोणावरही कुऱ्हाड चालवण्याची गरज नाही. संघाच्या कामगिरीचे कौतुक करा. संघ व्यवस्थापन केएल राहुलच्या पाठीशी उभे राहून योग्य करत आहे. केएल राहुल ग्रेट खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.