Kapil Dev kidnap : तोंडावर कापड... हात बांधलेले... कपिल देव यांना कोणी केलं किडनॅप? Video पाहून गंभीर चिंतेत

Kapil Dev: प्रसिद्ध क्रिकेटपटूचे अपहरण?
Kapil Dev kidnap
Kapil Dev kidnap Sakal digital
Updated on

Kapil Dev Kidnapped : टीम इंडिया सध्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करत आहे. कारण एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. यादरम्यान कपिल देव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कपिल देव यांची गणना भारतातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही हा व्हिडिओ शेअर केला असून त्याची चिंतेत व्यक्त केली.

Kapil Dev kidnap
Asian Games 2023 : चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास... लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

या व्हायरल व्हिडीओमध्ये कपिल देव यांचे दोन लोक हात बांधून आणि तोंडावर कपड बांधून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. कपिल देव अचानक मागे वळून पाहतात. त्यानंतरच ते कपिल देव असल्याची खात्री पटते. गौतम गंभीरनेही हे शेअर केले आहे. त्यांनी कपिल देव यांना टॅग केले.

हा व्हिडिओ शेअर करताना गौतम गंभीरने लिहिले की, 'ही व्हिडिओ क्लिप इतर कोणाला मिळाली आहे का? मला आशा आहे की ते प्रत्यक्षात कपिल देव नाहीत आणि कपिल पाजी ठीक आहेत. कपिलने त्याच्या उत्तरात काहीही लिहिलेले नाही. तसेच त्याने स्वतःबद्दल कोणतेही अपडेट दिलेले नाही.

गौतम गंभीरच्या या ट्विटनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. मात्र, सत्य हे आहे की हा व्हिडिओ एका जाहिरातीचं शूटिंग असल्याचं दिसत आहे, चाहत्यांनी सोशल मीडियावर असंही लिहिलं आहे की, हे एका जाहिरातीचे शूटिंग आहे आणि कपिल देव यांना काहीही झालं नाही.

5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होत आहे. भारताने आतापर्यंत 1983 आणि 2011 मध्ये दोनदा वर्ल्डकप जिंकला असून आता तिसऱ्यांदा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. टीम इंडियाने गेल्या 10 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.