Gautam Gambhir Virat Kohli Naveen Ul Haq Controversy : भारताने WTC Final गमावल्यानंतर संघातील खेळाडूंवर माजी क्रिकेटपटू टीका करत आहेत. गेल्या दशकभरापासून भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश येत आहे. WTC Final मध्ये फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र त्याला दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयश आले.
दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने हाच मुद्दा पकडत भारतातील व्यक्तीपूजा करण्याच्या फॅन कल्चरवर टीका केली. त्यााच रोख विराट कोहलीकडे होता. कारण विराट हा भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात मोठा फॅनबेस असलेला एकमेव खेळाडू आहे. गंभीरने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली सोबत झालेल्या वादावर देखील आपली प्रतिक्रिया दिली. गौतम गंभीर विराटसोबच्या वादावर पहिल्यांदाच बोलला.
गंभीर म्हणाला की, 'माझे क्रिकेटच्या मैदानावर अनेकवेळा वाद झाले आहेत. मात्र मी हा वाद कायम क्रिकेटच्या मैदानापुरताच मर्यादित ठेवला आहे. दोन व्यक्तींमध्ये वाद होतात ते सीमारेषेच्या आतच ठेवावेत. अनेक लोकं टीआरपीसाठी बरंच काही बोलतात. अनेकांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. दोन व्यक्तीमध्ये काय झालं होतं ते स्पष्ट करण्याची गरज नाही. ते क्रिकेटच्या मैदानावर झालं होतं मैदानाबाहेर नाही.'
'जर ते मैदानाबाहेर कुठंतरी झालं असतं त्यावेळी तुम्ही त्याला भांडण म्हणू शकला असता. भावनेच्या भरात दोन व्यक्ती ज्या आपल्या संघाला जिंकताना पाहू इच्छितात ते काहीतरी करून गेलेले असतात.'
गौतम गंभीरने नवीन उल हकच्या बाजूने उभे राहण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने काहीही चुकीचं केलं नव्हतं मात्र विराट कोहलीकडून ज्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळाला तेथून प्रकरण वाढलं.
गंभीर म्हणाला की, 'मी फक्त इतकंच सांगू शकतो की मी त्या व्यक्तीसाठी जे काही केलं ते योग्य होतं मी त्याचं समर्थन करतो. जर नवीन उल हकने काही चुकीचं केलेलं नाही असं मला वाटतं तर मी त्याच्यासाठी नक्कीच उभा राहणार. हे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार मग तो नवीन उल हक असो वा दुसरं कोणीही. जर मला वाटलं की तुम्ही योग्य आहात तर मी तुमच्या बाजूने उभे राहणार. मला हेच शिकवण्यात आलं आहे मी कायम करत राहणार. मी माझं आयुष्य असच जगतो.'
'खूप लोकं खूप काही बोलत असतात. मी नवीन उल हकला पाठिंबा देतोय तो आपला खेळाडू नाहीये. हा विषय तो खेळाडू आपला आहे की नाही याचा नाही. जर माझ्या संघातील खेळाडू चुकीचा असेल तर मी त्याच्या बाजूने उभा राहणार नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.