Gautam Gambhir WTC Virat Kohli : आपला देश व्यक्तीच्या भक्तीत... गौतम गंभीर आडून आडून विराटवर घसरलाच

Gautam Gambhir WTC Virat Kohli
Gautam Gambhir WTC Virat Kohli esakal
Updated on

Gautam Gambhir WTC Virat Kohli : भारताने सलग दुसऱ्यांदा WTC Final गमावली. त्यानंतर भारतीय संघाचे कुठं चुकलं याचा खल सुरू झालाय. भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपापली मतं व्यक्त केली. मात्र त्यात सर्वात हटके मत हे माजी सलामीवीर आणि 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील एक महत्वाचा खेळाडू गौतम गंभीरने भारत सातत्याने आयसीसी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत का ढेपाळतो याचे कारण सांगितले.

भारताने 2013 पासून आयसीसीची कोणतीच ट्रॉफी जिंकलेली नाही. नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये भारताला हा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला अन् भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.

Gautam Gambhir WTC Virat Kohli
WTCFinals : जागतिक कसोटी स्पर्धेच्या अजिंक्यपदाची गदा ऑस्ट्रेलियाच्या हाती

भारतीय संघ कोठे कमी पडतोय याबाबत गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले. त्याने भारतीय संघाला नाहीत भारतातील फॅन कल्चरला याला जबाबदार धरलं. गंभीरने न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आपला देश हा संघासाठी वेडा नाही तर व्यक्तीसाठी वेडा आहे. आपण आपल्या संघापेक्षा एका व्यक्तीला जास्त मोठं मानतो. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशात संघ हा एका व्यक्तीपेक्षा जास्त मोठा असतो.'

गौतम गंभीरने यापूर्वीही असेच मत व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की भारतीय क्रिकेट असो वा भारतीय राजकारण भारताने व्यक्तीपूजेतून बाहेर पडायला हवे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने देखील हाच मुद्दा मांडला होता.

Gautam Gambhir WTC Virat Kohli
Novak Djokovic : जोकोविचनं इतिहास रचला; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला टेनिसपटू

तो म्हणाला होती की, 'संघाचा कायापालट करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया इतरांपेक्षा जास्त चांगली आहे. कारण आमच्याकडे दिग्गज खेळाडू तयार करण्याची पद्धत नाही. त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की इयान हेलीने सहजरित्या अॅडम गिलख्रिस्टला रिप्लेस केलं. मार्क वॉला डेमिन मार्टिन, जस्टीन लँगरने मायकल स्लेटर यांना रिप्लेस केलं.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()