Bundesliga च्या इतिहासात पहिल्यांदाच रेफ्रीनं सूर्यास्ताला खेळ थांबवला

German Bundesliga Referee paused football Game for break Ramadan fast
German Bundesliga Referee paused football Game for break Ramadan fastesakal
Updated on

जर्मन बुंडेस्लिगा (German Bundesliga) फुटबॉल स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच रेफ्रीने सुरू असलेला फुटबॉल सामना सूर्यास्ताला काही काळासाठी थांबवला. हा खेळ मुस्लिम खेळाडूंना रमजानचा उपवास (Ramadan Fast) सोडता यावा यासाठी थांबवण्यात आला होता.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला रमजान महिन्याची सुरूवात झाली आहे. त्याच दरम्यान जर्मन बुंडेस्लिगा फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. सामने साधारणपणे संध्याकाळी (Sunset) होतात. त्यामुळे मेन्झ आणि ऑग्सबर्ग यांच्यात झालेला सामना थोडावेळासाठी थांबवण्यात आला. रेफ्री मॅटिअस जोलेनबेक यांनी सामन्याच्या 65 व्या मिनिटाला खेळ थांबवला. त्यामुळे मेन्झचा बचाव फळीतील खेळाडू मुसाला पाणी पिऊन आपला उपवास संपवता आला. मुसाने दोन बॉटलमधून पाणी पिले. रमजान महिन्यात ज्यांचा उपवास असतो त्यांना दिवसभरात काही खाता किंवा पिता येत नाही.

मुसा आपला उपवास संपवल्यानंतर रेफ्रीजवळ गेला. त्याने रेफ्रीशी हस्तांदोलन केले आणि उपवास सोडण्यासाठी खेळ थांबवल्याचे आभार मानले. अशीत घटना रविवारी देखील घडली ज्यावेळी रेफ्री बॅस्टियन डंकेर्ट यांनी मोहम्मद सिमकान याला पाणी पिऊन उपवास सोडता यावा यासाठी खेळ थोडावेळ थांबवला. गेल्या हंगामात प्रीमियर लीगमध्ये लिसियेस्टर सिटी आणि क्रिस्टर पॅलेस यांच्यात झालेला सामना देखील थांबवण्यात आला होता. त्यावेळी रेफ्री ग्रॅहम स्कॉट यांनी खेळाडूंना उपवास सोडता यावा यासाठी खेळ थोडा वेळा थांबवला होता.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार जर्मन रेफ्रीं समितीचे संवाद संचालक लुट्झ मायकेल फ्रोहलिच यांनी सांगितले की, 'या संदर्भात आम्ही कोणत्याही सुचना दिलेल्या नाहीत. पण, आम्ही रेफ्रींच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देतोय. रमजानचा उपवास असणाऱ्या खेळाडूंच्या विनंतीवरून अशा प्रकारचा ड्रिंक ब्रेक दिला जात आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.