Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल

Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल
Updated on

जपानमधील टोकियोमध्ये सुरु असेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची सगळीकडेच जोरदार चर्चा सूरू आहे. जगभरातील 205 देशांमधील खेळाडू यात सहभागी झाले असून कित्येक खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

ऑलिम्पिकच्या मैदानात रंगणारे सामने, नोंदवले जाणारे रेकॉर्ड याची चर्चा रंगत असताना टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्युदो सामन्यापूर्वी एका प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल
Olympics Day 6 : तिघींनी गाजवला दिवस!

ज्युदो क्रीडा प्रकारात जर्मनी देशाचे प्रतिनिधीत्व करणारी अ‍ॅथलीट मार्टिना ट्राजडोस हिला प्रशिक्षकाकडून कानाखाली मारतानाचे दृश्य व्हिडिओत कैद झाले. मंगळवारी दुपारी हंगेरीच्या सोझी ओझबास यांच्याबरोबर ट्राजडोस फाईट अगोदर हे दृश्य लाईव्ह झाले होते.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मार्टिनाच्या कोचने तिला जबरदस्तीने खांदे पकडून हलवताना दिसत आहेत आणि कानाखाली लगावत आहेत.

Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल
'द हंड्रेड'मध्ये स्मृतीचा धमाका; तिचा सिक्सर पाहाच (VIDEO)

मार्टिनाने हा व्हिडिओ इंस्टावर शेअर केला असून, ''जे झाले ते पुरेसे नव्हते'' असे कॅप्शन तिने दिले आहे. यापेक्षा वेगळं कॅप्शन सूचत नाही, असा उल्लेखही तिने केलाय. या व्हिडिओबाबत मार्टिनाने स्पष्टीकरणही दिले आहे. 'सामन्याच्या पूर्व तयारीसाठीची मी निवडलेली ही परंपरा आहे. माझ्या कोचने तेच केलं जे सामान्याआधी मला तयार करण्यासाठी गरजेच होतं.''

मार्टिनाच्या पोस्टवर कित्येक चाहत्यांनी कॉमेंट केली आहे. ''ज्यांनी कोणी ज्युडो खेळले आहे त्यांनाच हे समजू शकते'' अशी कॉमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे. मार्टिंनाच्या स्पष्टीकरणाबाबत काही चाहत्यांनी समाधान व्यक्त केले पण व्हिडिओमध्ये जे दिसत होते ते थोडे विचित्र होते असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.