Ghoomar : दिग्गज हर्षा भोगले, अजिंक्य रहाणेने घूमर चित्रपटावर केला कौतुकाचा वर्षाव

Ghoomar Harsha Bhogle Ajinkya Rahane
Ghoomar Harsha Bhogle Ajinkya Rahaneesakal
Updated on

Ghoomar Harsha Bhogle Ajinkya Rahane : आर. बाल्की दिग्दर्शित घूमर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट एका हार न मानणाऱ्या महिला क्रिकेटपटूची आहे. या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र क्रिकेट समिक्षक हर्षा भोगले आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी विशेष कौतुक केल्याने या चित्रपटाबाबतची क्रेज अजूनच वाढली आहे.

हर्षा भोगले आणि अजिंक्य रहाणे यांनी ट्विटवर व्हिडिओ पोस्ट करून घूमरबाबतचा आपला अनुभव शेअर केला. घूमर चित्रपटात अभिषेक बच्चन, सयामी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी हे प्रमुख भुमिकेत आहेत. आर. बाल्की यांनी हा क्रिकेटविषयक चित्रपट अनोख्या पद्धतीने दिग्दर्शित केला आहे.

Ghoomar Harsha Bhogle Ajinkya Rahane
Ireland Vs India 1st T20I : हाऊसफुल! जसप्रीतच्या टीम इंडियामुळं आयर्लंड क्रिकेट चांगलंच फायद्यात

हर्षा भोगले यांनी या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, अभिनेत्री सयामी खेर क्रिकेट खेळल्यामुळे तिला बारकावे माहिती होते. मात्र दिग्दर्शिका आर. बाल्कीने या चित्रपटात हे क्रिकेटमधील बारकावे फार उत्तम प्रकारे सादर केले आहेत. क्रिकेटविषय चित्रपटात भावना ओथंबून वाहत असतात. मात्र क्रिकेटमधील ते बारकावे म्हणावे तशे चित्रित होत नाहीत. मात्र हा चित्रपट त्याला अपवाद आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहताना मला मजा आली.

Ghoomar Harsha Bhogle Ajinkya Rahane
Asia Cup 2023 : आयपीएल स्टारची कारकीर्द संपली? 13 ODI सामन्यात 55.71 च्या सरासरीने धावा तरी रोहित देणार डच्चू?

अजिंक्य रहाणेने देखील चित्रपट पाहिल्यानंतर व्हिडिओ शेअर करत घूमरचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, मी नुकतेच घूमर चित्रपट पाहिला. हा चित्रपट मला खूप आवडला. खूप भावनिक आणि प्रेरणा देणारा चित्रपट आहे.'

'सयामी खेरने साकारलेलं पात्र हे खूप छान आहे. तुम्ही डावखुरे नसताना डाव्या हाताने गोलंदाजी करणे किती अवघड असते हे मला माहिती आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट नक्की पाहा.'

घूमर चित्रपट हा उद्या (दि. 17) सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.