Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकप 2023 ची सेमीफायनल गाठली. अफगाणिस्तानने ठेवलेल्या 292 धावांचे आव्हान पार करताना कांगारूंची अवस्था 7 बाद 91 अशी झाली होती. मात्र ग्लेन मॅक्सवेलने एकाहाती सामना फिरवला. त्याने 128 चेंडूत नाबाद 201 धावा ठोकल्या.
विशेष म्हणजे ग्लेन मॅक्सवेलला या खेळीदरम्यान तीव्र स्वरूपाचे क्रॅम्प येत होते. या क्रॅम्पमुळे तो वेदनेने मैदानावर खाली देखील कोसळला होता. मात्र त्याने सामना आणि लढाई सोडली नाही. त्याने पायाला दुखापत झाल्यानंतर जागेवर उभारून चौकार आणि षटकारांची बरसात केली. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्लेन मॅक्सवेलची ही 201 धावांची द्विशतकी इनिंग ऐतिहासिक ठरली. त्याने वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी ख्रिस गेलने 2015 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये 138 चेंडूत द्विशतक ठोकले होते.
याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाकडून वनडेमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीराव्यतिरिक्त सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मॅक्सवेल पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल झिम्बाब्वेचा चार्ल्स कॉव्हेन्ट्रे याचा नंबर लागतो. त्याने 2009 मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद 194 धावा केल्या होत्या.
ग्लेन मॅक्सवेलने भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचे वर्ल्डकपमध्ये सहाव्या क्रमांकावर केलेल्या सर्वाधिक 175 धावांचा विक्रम देखील मोडला. तसेच वनडेमध्ये सातव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची दमदार भागीदारी रचली.
ही भागीदारी वनडे इतिहासातील सातव्या क्रमांकासाठी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम जॉस बटलर आणि अदिल राशिद यांच्या नावावर होता. त्याने 2015 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध 177 धावांची भागीदारी रचली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.