Glenn Maxwell Leg Fracture : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. मॅक्सवेलचा पाय तुटल्याने अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण उन्हाळी हंगामात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळू शकणार नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर आता तो जवळपास 3-4 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. मॅक्सवेल हा टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. मॅक्सवेलने टी-20 विश्वचषकाच्या चार सामन्यात 39.33 च्या सरासरीने एकूण 118 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 161.64 होता.
नेमकं काय घडलं -
वास्तविक, मॅक्सवेल मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. तिथे त्याच्यासोबत हा अपघात झाला. मित्राच्या घरामागे अंगणात धावत येत होता. यादरम्यान त्यांचा पाय घसरला. फ्रॅक्चरमुळे त्याचा पाय पूर्णपणे स्थिर झाला होता. या घटनेनंतर मॅक्सवेल बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार हे मात्र नक्की आहे. पुढील आठवड्यापासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत मॅक्सवेलचा समावेश करण्यात आला होता पण आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.
मॅक्सवेलचा बाहेर पडणे ऑस्ट्रेलियासाठी मोठे नुकसान असणार आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. मॅक्सवेल त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे लांब षटकार मारण्याची क्षमता आहे. मॅक्सवेल क्षणार्धात सामन्याचा मार्ग बदलू शकतो. विशेष म्हणजे तो ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.