NZ vs SL : ग्लेन फिलिप्सचे झुंजार शतक, एकट्यानेच केली लंकेची धुलाई

NZ vs SL Glenn Phillips
NZ vs SL Glenn Phillipsesakal
Updated on

NZ vs SL Glenn Phillips : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप 1 च्या न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात किवींनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या. खराब सुरूवातीनंतर ग्लेन फिलिप्सने झुंजार शतकी (64 चेंडूत 104) खेळी केली. न्यूझीलंडचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एकट्या ग्लेन फिलिप्सने धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडला 150 चा टप्पा पार करून दिला. त्याला डॅरेल मिचेलने 22 तर सँटनरने 11 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 2 तर हसरंगा, तिक्षाणा, डिसिल्वा आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सिडनीची खेळपट्टी थोडी संथ आणि फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे लंकेसमोर असलेले 168 धावांचे आव्हान तसे तगडेच आहे.

NZ vs SL Glenn Phillips
PAK vs ZIM Shoaib Malik : खुद्द शोएब मलिकने 'डेड बॉल'वरून बाबर सेनेला काढलं वेड्यात

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या षटकापासूनच श्रीलंकेने न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. पहिल्या षटकात फिरकीपटू महीष तिक्षाणाने एलन फिनला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर कॉनवॉय 1 तर विलियम्स 8 धावांची भर घालून माघारी परतला. यामुळे किवींची पॉवर प्लेमध्येच अवस्था 3 बाद 15 धावा अशी बिकट झाली.

न्यूझीलंडची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. फिलिप्सने आक्रमक अवतार धारण केला. सातव्या षटकात निसंकाने फिलिप्सला जीवनदान देत त्याच्या खेळीला हातभार लावला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 84 धावांची दमदार भागीदारी रचून न्यूझीलंडला शंभरच्या जवळ पोहचवले.

NZ vs SL Glenn Phillips
Roger Binny : 'स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती' BCCI अध्यक्षांचं कोहलीबद्दल मोठे विधान

मात्र वानिंदू हसरंगाने 24 चेंडूत 22 धावा करणाऱ्या मिचेलचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. दरम्यान, फिलिप्सने आपले अर्धशतक पार केले होते. त्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली. पुन्हा एकदा करूणारत्नेने ग्लेनला जीवनदान दिले. यानंतर ग्लेन फिलिप्सने थेट शतकच ठोकले. टी 20 वर्ल्डकपमधील हे त्याचे वैयक्तिक पहिले शतक ठरले.

अखेरच्या षटकात फिलिप्स 64 धावात 104 धावा ठोकून बाद झाला. मात्र सँटनरने 5 चेंडूत नाबाद 11 आणि शेवटचा चेंडू खेळायला आलेल्या टीम साऊदीने चौकार मारत न्यूझीलंडला 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.