G.O.A.T Cristiano Ronaldo! पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटूचा वर्ल्ड रेकॉर्ड, आनंद इतका की तोही झाला Emotional

Cricstiano Ronaldo 900 goals: ख्रिस्तियानो रोनाल्डोने शुक्रवारी पहाटे त्याच्या जगभरातील चाहत्यांना सुखद धक्का दिला. रोनाल्डोने पुन्हा एकदा तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम अर्थात GOAT आहे हे सिद्ध केले.
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldoesakal
Updated on

Cricstiano Ronaldo 900 goals: स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने शुक्रवारी पहाटे त्याच्या जगभरातील चाहत्यांना सुखद धक्का दिला. कारकीर्दित ९०० गोल्स करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. अल-नासरच्या फॉरवर्डने UEFA Nations Leagueमध्ये क्रोएशियाविरुद्ध हा विश्वविक्रम नोंदवला. रोनाल्डोच्या याच गोलच्या जोरावर पोर्तुगालने २-१ असा फरकाने क्रोएशियाचा पराभव केला. पोर्तुगालसाठी दुसरा गोल डिओगो दलॉटने केला.

"या यशाचा माझ्यासाठी खूप मोठा अर्थ आहे," असे रोनाल्डो म्हणाला. “हे एक असे शिखर होते, की जे मला बऱ्याच दिवसांपासून सर करायचे होते. मी यात यशस्वी होईल, याची खात्री होती. मी खेळल राहिलो तर हे शक्य होईल, हे मला माहित होते,''असेही तो म्हणाला.

“या विक्रम मला इतर विक्रमांसारखाच वाटतोय. दररोज मेहनत घेणे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आणि त्यानंतर ९०० गोल्स करणे किती कठीण आहे, हे फक्त मला आणि माझ्या सोबतच्या लोकांना माहित आहे. माझ्या कारकिर्दीतील हा एक अविश्वसनीय मैलाचा दगड आहे,''असेही त्याने मान्य केले.

वयाच्या ३९ व्या वर्षी रोनाल्डोने दाखवून दिले की तो अजूनही मैदानावर दमदार खेळ करू शकतो. त्याने FIFA वर्ल्ड कप २०२२ आणि UEFA युरो २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. रोनाल्डोचा हा १३१ वा आंतरराष्ट्रीय गोल होता. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक ८५९ गोल्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने रेआल माद्रिदसाठी ४५० गोल्स, जुव्हेंटससाठी १०१ गोल्स, मँचेस्टर युनायटेडसाठी १४५ गोल्स, स्पोर्टिंग लिस्बनसाठी ५ आणि त्याच्या नवीन क्लब अल नासरसाठी ६८ गोल केले आहेत.

निवृत्ती कधी?

पोर्तुगालकडून खेळण्यासाठी अजून आपल्यामध्ये बरीच क्षमता शिल्लक आहे, त्यामुळे एवढ्यात आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट मत रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. तो म्हणाला, वेळ येईल तेव्हा मी स्वतःच बाहेर पडेन, माझ्यासाठी तो निर्णय कठीण नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.