Elora Tournament : निखत झरीन, मीनाक्षी यांना एलोद्रा स्पर्धेत सुवर्णपदके

विद्यमान विश्वविजेती निखत झरीन आणि मीनाक्षी यांनी एलोद्रा करंडक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली.
Elora tournament
Elora tournamentsakal
Updated on

अस्ताना (कझाकस्तान) : विद्यमान विश्वविजेती निखत झरीन आणि मीनाक्षी यांनी एलोद्रा करंडक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली. भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण १२ पदकांची कमाई केली. निखत आणि मीनाक्षी यांच्या सुवर्णपदकांसह भारतीयांनी दोन रौप्य आणि आठ ब्राँझपदके मिळवली.

गतवर्षी या स्पर्धेत भारताला केवळ पाच पदकांची कमाई करता आली होती. ५२ किलो गटात निखतने आपले वर्चस्व कायम राखताना कझाकस्तानच्या झाझरिया उरब्रेवा हिचा ५-० असा पराभव केला; तर मीनाक्षीने ४८ किलो गटात उझबेकिस्तानच्या रेहमोनोवा सिदाहोन हिचे आव्हान ४-१ असे मोडून काढले.

अनामिका (५० किलो) आणि मनीषा (६०) यांना मात्र अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांना रौप्यपदक मिळाले.

भारताचे पदक विजेते बॉक्सर

सुवर्ण : मीनाक्षी (४८), निखत झरीन (५२)

रौप्यपदक :अनामिका (५०) आणि मनीषा (६०)

ब्राँझपदक : पुरुष : येफाबा सिंग सोईबाम (४८), अभिषेक यादव (६७), विशाल (८६) आणि गौरव चौहान (९२+). महिला : मंजू बम्बोरिया (६६), शलाखा सिंग सनसनवाल (७०) आणि मोनका (८१+)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com