महाराष्ट्राच्या कन्येचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

Priyanka Mangesh Mohite
Priyanka Mangesh Mohiteesakal
Updated on
Summary

सातारकर ज्या क्षणाची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते, अखेर तो अभिमानास्पद क्षण येऊन ठेपलाच.

सातारा : सातारकर ज्या क्षणाची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते, अखेर तो अभिमानास्पद क्षण येऊन ठेपलाच. प्रियांका मंगेश मोहिते (Priyanka Mangesh Mohite) ही महाराष्ट्राची शिखरकन्या! भारत सरकारमार्फत दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च म्हणता, येईल असा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2021 (Tenzing Norgay National Adventure Award 2021) जाहीर झाला. हा पुरस्कार सन 1993 पासून जमीन, पाणी, पर्वत आणि आकाशातील अदम्य साहसांकरिता विशेषत्वानं सुरु करण्यात आलाय. प्रियांकाला गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडाप्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी हा पुरस्कार जाहीर झालाय.

हा अत्त्युच्च पुरस्कार प्रियांकाचा गुणगौरव तर आहेच, त्याचबरोबर प्रियांकाच्या पर्वतीय साहसाला कारणीभूत ठरलेला गिरीदुर्गराज सह्याद्री, मराठी माणसातील प्रखर जिद्द आणि साहस, तसेच ललामभूत महाराष्ट्राचाही अभिमान आहे. गिर्यारोहणातील विशेष उल्लेखनिय कामगिरीकरिता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2019 साली मिळाला आहे. जगातील 14 अष्टहजारी हिमशिखरांपैकी 4 हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून जगभरात सुविख्यात आहे.

Priyanka Mangesh Mohite
'हा' आहे जगातला सर्वात महागडा मासा; किंमत करोडोंत

इतकेच नाही, तर जगातील सर्वोच्च अशा माऊंटएव्हरेस्टवर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मिळवलेल्या तगड्या यशानंतर, जगातील 4 थे अत्त्युच्च ल्होत्से (8,516 मीटर), 5 वेअत्त्युच्च मकालू (8,463 मीटर) आणि 2021 मध्ये तर अत्यंत भयावह असे 10 वे अत्त्युच्च अन्नपूर्णा (8,091 मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरित्या चढाई केलेली देखील ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली. त्यामुळेच तीच्या उदंड साहसाचा सन्मानपूर्ण गुणगौरव या पुरस्कारामुळे झालेला आहे. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत एका सोहळ्यात प्रियांकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Priyanka Mangesh Mohite
'हे' आहे जगातलं सर्वात महागडं 'पाणी'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.