Khashaba Jadhav : शाहू महाराजांच्या वंशजांनी व्यक्त केलेली 'ती' खंत योग्यच; असं का म्हणाले खाशाबांचे सुपूत्र?

भारताला ऑलिंपिकमध्ये (Olympics) पहिलं कांस्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वरचे सुपुत्र खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांची आज जयंती आहे.
Indian Westler Khashaba Dadasaheb Jadhav
Indian Westler Khashaba Dadasaheb Jadhavesakal
Updated on
Summary

देशासाठी त्यांनी मिळविलेल्या पहिल्या ऑलिंपिक पदकामुळं खाशाबा जाधव यांचं नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरानं कोरलं आहे. त्यांच्या कार्याची दखल आज त्यांच्या जन्मदिनी गुगलनं घेतली आहे.

कऱ्हाड (सातारा) : भारताला ऑलिंपिकमध्ये (Olympics) पहिलं कांस्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वरचे सुपुत्र खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांची आज जयंती आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची गुगलनं दखल घेवून त्यांच्यावर एक डुडल तयार केलं आहे.

भारताला कुस्तीत मिळालं पहिलं ऑलिंपिक पदक

दरम्यान, त्यांचे पुत्र रणजीत जाधव (Ranjit Jadhav) यांनी जगभरात वापरल्या जाणाऱ्या गुगलनं खाशाबा जाधव यांच्या कार्याची दखल घेतली. मात्र, भारत सरकारनं त्यांना अद्याप पद्मभूषण पुरस्कार दिला नाही, अशी खंत व्यक्त केलीये. खाशाबा जाधव यांचा जन्म कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर गावी 15 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांनी मोठ्या कष्टानं शरीर कमावून कुस्तीत नाव कमावण्याचा मानस केला. त्यानुसार त्यांनी 1948 साली लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत 1952 साली भारत देशाला कुस्तीतील पहिलं ऑलिंपिकपदक मिळवून दिलं.

'भारत सरकारनं खाशाबांच्या कार्याची दखल घ्यावी'

देशासाठी त्यांनी मिळविलेल्या पहिल्या ऑलिंपिक पदकामुळं खाशाबा जाधव यांचं नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरानं कोरलं आहे. त्यांच्या कार्याची दखल आज त्यांच्या जन्मदिनी गुगलनं घेतली आहे. त्यांच्यासाठी एक डुडल तयार करुन ते गुगलनं प्रकाशित केलं आहे. त्यामुळं त्यांच्या कार्याला जगभरातून उजाळा मिळाला आहे. दरम्यान, जगभरात वापरल्या जाणाऱ्या गुगलनं दखल घेतली, मात्र भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पद्म पुरस्कारही जाहीर केला नाही, अशी खंत त्यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

'मरणोत्तर पद्मभूषण देवून यशोचित गौरव करेल'

याबाबत बोलताना ते पुढं म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशजांनी खाशाबा जाधवांना राजाश्रय दिला होता. त्यांच्याच सहकार्यानं त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली होती. गुगलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मनं मानवंदना दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी खंत व्यक्त केलेली बरोबरच आहे. केंद्र व राज्य सरकार त्यांना गौरवांकित करण्यासाठी का मागं पडत आहे, हा मोठा प्रश्न आहे. देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणं केंद्र व राज्य शासन त्यांच्या कार्याची दखल घेवून २६ जानेवारीला मरणोत्तर पद्मभूषण देवून यशोचित गौरव करेल. महाराष्ट्र शासनानं त्यांच्या नावानं कुस्ती संकुल घोषित केलं आहे. त्याचंही काम या सरकारकडून मार्गी लागेल, अशी खात्री आहे.

मंत्री शंभूराज देसाई घालणार लक्ष

गोळेश्वर गावचे सुपुत्र ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी देशाला पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून दिलं. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रातील सरकार घेईल, असं सांगून मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शाखाबा जाधव यांच्या प्रलंबित कामकाजासंदर्भात मी स्वतः त्यात लक्ष घालून ते काम मार्गी लावणार आहे. त्यासंदर्भात मी त्यांच्या नातेवाइकांनाही भेटलो आहे.

Indian Westler Khashaba Dadasaheb Jadhav
Khashaba Jadhav : इकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपली अन् तिकडं 'गुगल'ची खाशाबांना सलामी

संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची आज जयंती. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत खाशाबा जाधव यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी गुगलनं दखल घेतली पण, सरकारनं नाही. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागं होणार, हाच प्रश्न आहे ” अशी खंत त्‍यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()