Jinnah and IPL: पाकिस्तानचे संस्थापक जिन्नांचा पणतू आहे IPLच्या 'या' संघाचा मालक

आयपीएल ही भारतातील क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा आहे.
Jinnah_IPL
Jinnah_IPL
Updated on

नवी दिल्ली : भारताची फाळणी करुन पाकिस्तानची निर्मिती करणारे मोहम्मद अली जिन्ना यांचा पणतू इंडियन प्रिमियर लीग अर्थात IPLमधील एका संघाचा मालक आहे. पण कोण आहे ही व्यक्ती हे जाणून घेण्यापूर्वी आयपीएलचा इतिहास आणि जिन्नांचा इतिहास जाणून घेऊयात. (great grandson of Pakistan founder Muhammad Ali Jinnah is owner of a team of IPL)

आयपीएल काय आहे?

इंडियन प्रिमियर लीग अर्थात IPL ही एक वीस षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे. बीसीसीआय दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करते. यामध्ये दरवर्षी दहा टीम खेळतात. या टीमची नावं भारतातील महत्वाच्या शहरांवरुन देण्यात आलेली आहेत. सन २००७ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. सध्या या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनराईजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स या टीम आहेत.

आयपीएलशी जिन्नांचा संबंध काय?

आता पाहुयात जिन्नांशी संबंध असलेला आयपीएलच्या टीमचा मालक कोण? तर ही व्यक्ती आहे नेस वाडिया. नेस वाडिया हा पंजाबच्या टीमचा सहमालक आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघे या टीमचे संघमालक आहेत. वाडिया ग्रुप हा भारतातील एक प्रतिष्ठित बिझनेस ग्रुप आहे. प्रिती झिंटाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नेस वाडिया काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता.

Jinnah_IPL
MPSC Exam: सर्वसाधारण गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांना EWSमधून नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

नेस वाडियाच्या कुटुंबाचा थेट संबंध हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी आहे. नेस वाडिया यांचे वडील नुस्ली वाडिया हे जिन्ना यांचे नातू आहेत. मोहम्मद अली जिन्ना यांना एकूण सात भावंड होती. त्यांची दोन लग्नही झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव एमीबाई जिन्ना होतं. पण या दोघांचा संसार जास्त काळ टिकू शकला नाही, त्यांना मुलबाळंही झालं नाही.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

यानंतर जिन्ना यांनी मरियम यांच्याशी लग्न केलं. मरियम आणि जिन्ना यांना एक मुलगी झाली तिचं नाव डिना होतं. डिना हीचं लग्न नेविल वाडिया यांच्याशी झालं होतं. या दोघांना मुलगा झाला त्याचं नाव नुस्ली वाडिया होय. पुढे नुस्ली वाडियांचं लग्न मॉरिन यांच्याशी झालं त्यानंतर त्यांना नेस आणि जहांगीर अशी दोन मुलं झाली. यांपैकी नेस वाडिया हा पंजाबच्या किंग्ज या संघाचा मालक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.