रोनाल्डोने रचला इतिहास; गिनीज बुकमध्ये नोंद, आता निवृत्तीचा भाषा

आपल्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होताच रोनाल्डोने निवृत्तीवर केले भाष्य
Guinness World Records Honours Cristiano Ronaldo for Creating History in International Football
Guinness World Records Honours Cristiano Ronaldo for Creating History in International Football
Updated on

ख्रिस्तियानो रोनाल्डो नेहमीच त्याच्या पराक्रमामुळं चर्चेत असतो. रोनाल्डोने असाच एक इतिहास रचला आहे ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर त्यानं निवृत्तीवर भाष्य करत चाहत्यांना मोठी अपडेट दिली आहे. (Guinness World Records Honours Cristiano Ronaldo for Creating History in International Football)

पोर्तुगालकडून २०० सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला आणि त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. २० जूनला झालेल्या युरो २०२४च्या पात्रता स्पर्धेत आईसलँडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हे विक्रमाचे शिखर गाठले. त्याच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने विजय मिळवला अन् युरो २०२४मध्ये संघाचा प्रवेश पक्का केला.

निवृत्तीवर केले भाष्य

रोनाल्डोला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून एक प्रशंसापर रेकॉर्ड धारक म्हणून अधिकृत प्रमाणपत्र मिळाले. त्याला जर्सीवर २०० क्रमांक असलेला पोर्तुगालचा शर्ट देखील मिळाला. विक्रम साध्य करूनही ३८ वर्षीय रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केलं.

रोनाल्डोने या २०० सामन्यांत १२३ गोल्स केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याने पटकावला आहे. पोर्तुगालने युरो पात्रता स्पर्धेत सलग सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची पाटी कोरी ठेवली आहे. मागच्या वर्षी रोनाल्डोने २०२५ पर्यंत अल नस्सरसोबत करार केला. यासाठी त्याला २०० मिलियन यूरो (१७७५ कोटी रुपये) मिळणार आहेत.

रोनाल्डोने २००९- १८ पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.