Ravindra Jadeja & Rivaba : हॅलो MLA... रिवाबाच्या विजयानंतर 'सर' जडेजाचे ट्विट व्हायरल

भाजपने पहिल्यांदाच गुजरातमध्ये १५० हून अधिक जाग मिळवत मोठा विजय मिळवला आहे.
Ravindra Jadeja & Rivaba
Ravindra Jadeja & Rivaba Sakal
Updated on

Ravindra Jadeja and Rivaba : गुजरात विधानसभेचा 2022 चा निकाल जनतेसमोर आले असून, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या आहेत. गुजरातमधील भाजपचा हा विजय खूप मोठा मानला जात आहे. भाजपने पहिल्यांदाच गुजरातमध्ये १५० हून अधिक जाग मिळवल्या आहेत.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

गुजरात विधानसभा निवडणुकीत अनेक मोठे चेहरे विजयी झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाच्या नावाचाही समावेश आहे, रिवाबा यांनी जामनगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. रिवाबा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे करशनभाई यांचा ५३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रिवाबा यांना ८८,८३५ मते मिळाली, तर करशनभाई यांना केवळ ३५२६५ मते मिळाली.

रिवाबाच्या विजयानंतर रवींद्र जडेजानेही रिवाबाचे अभिनंदन करणारे ट्विट केले असून जामनगरच्या जनतेचे आभार मानले आहेत. जडेजाने ट्वीट करताना 'हॅलो MLA , तुम्ही खरोखरच याच्या हकदार असून, जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आशापुरा मातेकडे जामनेरची कामे खूप चांगली होवो हिच विनंती. जय माताजी.' असे ट्वीट केले आहे.

Ravindra Jadeja & Rivaba
Ravidnra Jadeja : रविंद्र जडेजाने पत्नी जिंकल्यानंतर दुसऱ्याचं ट्विट केलं रिट्विट

पहिल्या प्रयत्नात मोठा विजय

गुजरातमध्ये पार पडलेल्या भाजपच्या विजयाकडे आणि रिवाबा यांच्या विजयाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रवींद्र जडेजाची पत्नी पहिल्याच प्रयत्नात मोठा विजय मिळवला जात आहे. रिवाबा सौराष्ट्रच्या करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या. या वर्षाच्या सुरुवातीपासून रिवाबा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.