WPL 2023 GG vs MI : मुंबई इंडियन्सने गुजरातचा तब्बल 143 धावांनी पराभव करत केली विजयी सुरूवात

WPL 2023 MI vs GG LIVE
WPL 2023 MI vs GG LIVE esakal
Updated on

WPL 2023 MI vs GG LIVE : वुमन्स प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) उद्घाटनाच्या सामन्यातच गुजरात जायंट्सच्या खराब खेळाचे धिंडवडे निघाले. मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पहिल्याच सामन्यात 143 धावांनी पराभव करत WPL 2023 ची दणक्यात सुरूवात केली. नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजी स्विकारली.

मात्र मुंबईने 20 षटकात 5 बाद 207 धावा चोपून गुजरातच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली. मुंबईच्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. गुजरातचा संपूर्ण संघ 64 धावात तंबूत परतला.

मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 65 धााव चोपून WPL मधील पहिले अर्धशतक ठोकण्याचा मान पटकावला. तिला हेली मॅथ्यूजने 47 तर एमेलिया केरने 45 धावा करत चांगली साथ दिली. गुजरातकडून स्नेह राणाने 43 धावात 2 बळी टिपले. तर फलंदाजीत गुजरातकडून दयालन हेमलताने एकाकी झुंज देत 29 धावांची खेळी केली. मुंबईकडून इशाकने 11 धावात 4 बळी टिपले.

इशाकने संपवली गुजरातची फडफड 

इशाकने आपली चौथी शिकार करत मोनिका पटेलचा 10 धावांवर त्रिफळा उडवला. याचबरोबर गुजरातचा डाव 64 धावात संपुष्टात आला.

50-8 (13.2 Ov) : हेमलताने वाचवली लाज

गुजराज जायंट्सच्या हेमलताने संघाच्या 27 धावांवर 7 विकेट्स पडल्या असताना झुंजार खेळी करत अर्धशतकी मजल मारून दिली.

23-7 : गुजरातची पडझड सुरूच

मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनंतर फिरकीपटूंनी गुजरातच्या फलंदाजाली भगदाड पाडण्यास सुरूवात केली. इशाक आणि एमेलिया केरने गुजरातची अवस्था 7 बाद 23 धावा अशी केली.

5-3 : गुजरातची फलंदाजी ढेपाळली

मुंबईच्या 207 धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात जायंट्सची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज नॅट सिवर ब्रंट आणि इसी वाँगने भेदक मारा करत गुजरातचे पहिले तीन फलंदाज 5 धावातच मघारी धाडले.

हरनमचे दमदार अर्धशतक, मुबंईच्या 207 धावा 

MIW 113/3 (13) : कर्णधार हरमनने डाव सावरला

सलामीवीर मॅथ्यूज आणि ब्रंट ही आक्रमक जोडी पाठोपाठ बाद झाल्यानंतर मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने मुंबईचा डाव सावरत संघाला शतकी मजल मारून दिली. तिने 16 चेंडूत 30 धावा चोपल्या.

77-3 :गार्डनरने केली मोठी शिकार 

गार्डनरने मुंबईची सलामीवीर हेले मॅथ्यूजला 47 धावांवर बाद करत मुंबईला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

69-2 : वॉरहमने तोडली अर्धशतकी भागीदारी 

मॅथ्यूज आणि ब्रंट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 9 व्या षटकात 69 धावांपर्यंत पोहचवले. मात्र वॉरहमने नॅट सिवर ब्रंटला 23 धावांवर बाद करत मुंबईला दुसला धक्का दिला.

MIW 49/1 (7) : मुंबईची दमदार सुरूवात 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या धक्क्यानंतर दमदार सुरूवात केली. सलामीवीर हेले मॅथ्यूजने आक्रमक फलंदाजी केली. तर तिला नॅट सिवर ब्रंटने देखील चांगली साथ देत संघाला 7 व्या षटकात अर्धशतकाजवळ पोहचवले.

15-1 : तुनजा कनवारने घेतली WPL मधील पहिली विकेट 

गुजरात जायंट्सची डावखुरी फिरकीपटू तनुजा कनवारने WPL मधील पहिली विकेट घेतली. तिने मुंबई इंडियन्सच्या यस्तिका भाटियाला अवघ्या 1 धावेवर बाद केले.

राष्ट्रगीताने WPL च्या पहिल्या सामन्याची सुरूवात

गुजरातने नाणेफेक जिंकली. 

गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधारांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण

WPL च्या उद्घाटन सोहळ्यानंतर बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी स्टेजवर आले. याचबरोबर लीगमधील पाचही कर्णधारांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. यानंतर हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाने WPL ट्रॉफीचे अनावरण केले.

कृतीचे बादलपे पावं हैं... 

कियारा अडवाणीनंतर कृतीसनोनने बादल पे पावं हैं म्हणत वुमन्स प्रीमियर लीगचा झेंडा फडकवला.

कियारा अडवाणीच्या क्या बात हैं गाण्याने सोहळा सुरू

उद्घाटन सोहळ्याचा पहिला डान्स हा कियारा आडवाणीच्या क्या बात है गाण्याने सुरू झाला.

मंदिरा बेदीने सुरू केला उद्घाटन सोहळ्याची सुरूवात

भारताची पहिली महिला क्रिकेट प्रेझेंटर असलेल्या मंदिरा बेदीने WPL लीगच्या पहिल्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरूवात केली.

महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण 

बुमन्स प्रीमियर लीगचा पहिला वहिला हंगाम आजपासून डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.