Hangzhou Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताच्या हॉकी टीमनं गट सामन्यात पाकिस्तानला १०-२ नं धूळ चारली. इतक्या मोठ्या फरकानं भारताचा विजय झाल्यानं हा आजवरचा भारतीय हॉकी विश्वातला ऐतिहासिक विजय मानला जात आहे. (Hangzhou Asian Games 2023 India beat Pakistan Men Hockey Pool A match)
सामना सुरु झाल्यानंतर भारतानं पहिल्या हाफमध्ये चार गोल केले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ६ गोल केले. तर दुसरीकडं पाकिस्तानच्या टीमला पहिल्या हाफमध्ये खातंही उघडता आलं नाही पण दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करण्यात यशस्वी ठरले. (Latest Sport News)
पण भारताच्या आक्रमक खेळापुढं पाकिस्ताननं अक्षरशः नांगी टाकली. या मोठ्या विजयानंतर भारतानं सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. (Latest Marathi News)
कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी हा सलग चौथा विजय मिळवला आहे. यानंतर आता गट सामन्यात अर्थात पूल ए मध्ये भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. आजच्या सामन्यात कर्मधार हरमनप्रीतनं एकूण ४ गोल केले. याशिवाय वरुणनं २ गोल, ललित, शमशेर, मनदीप आणि सुमीत यांनी प्रत्येकी १ गोल केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.