चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. आज भारताच्या महिला कबड्डी टीमने गोल्ड मेडल जिंकले. यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 100 आणि गोल्ड मेडल्सची संख्या 25 झाली आहे.
भारताच्या महिला कबड्डी टीमने अंतिम सामन्यात तैवानला 26-25 अशा फरकाने हरवलं. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम 14-9 ने आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.
या गोल्ड मेडलसह भारताने या एशियन गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये 25 गोल्ड, 35 सिल्व्हर आणि 40 ब्राँझ मेडल्सचा समावेश आहे.
भारताने आतापर्यंत नऊ खेळांमध्ये कमीत कमी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. यातील सर्वाधिक (7) गोल्ड शूटिंगमध्ये मिळाले आहेत. तर, अॅथलेटिक्समध्ये 6 गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. आर्चेरीमध्ये 5 तर स्क्वाशमध्ये 2 गोल्ड मेडल मिळाले आहेत. यासोबतच टेनिस, हॉकी, कबड्डी, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक-एक गोल्ड मिळाले आहेत.
आज दुपारी पुरूष कबड्डी टीम आणि पुरूष क्रिकेट टीम या दोन्हींचा अंतिम सामना आहे. या दोन्ही टीम्सकडून गोल्ड मेडलची आशा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.