Asian Para Games 2023 : भारताचा ट्रिपल धमाका; उंच उडी, क्लब थ्रोमध्ये जिंकली तीनही पदके

Asian Para Games 2023
Asian Para Games 2023esakal
Updated on

Asian Para Games 2023 Hangzhou : हांगझू येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने उंच उडी आणि क्लब थ्रोमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय पुरूष संघाने तीनही पदके आपल्या नावावर केली आहे. याचबरोबर पुरूष क्लब थ्रो F5 प्रकारात प्रणव सूरमाने देखील सुवर्ण पदकाची कमाई केली. तर धरमबीर आणि अमित कुमार हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.

Asian Para Games 2023
VIDEO: IND-NZ सामन्यात कोहली अन् रोहितमध्ये झाली बाचाबाची? ICC चा 'हा' व्हिडिओ पाहून चाहत्यांना बसला धक्का

शैलेश कुमारने एशियन पॅरा गेम्समध्ये पुरूष उंच उडीत 1.82 मीटर उंच उडी मारत रेकॉर्ड प्रस्थापित केले. त्याने T63 प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तर भारताच्याच मरियप्पन थांगावेलूने 1.80 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक पटकावले. कांस्य पदरावर देखील भारतातीच मोहर उमटली. गोविंदभाई पाधियारने 178 मीटर उंच उडी मारत कांस्य पदकावर कब्जा केला.

पुरूष क्लब थ्रो F51प्रकारात सूरमाने एशियन पॅरा गेम्समध्ये 30.01 मीटर थ्रो करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. त्याने सुवर्ण पदक जिंकले. तर धरमबीर 28.76m आणि अमित कुमार 26.93m लांब थ्रो करत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

Asian Para Games 2023
Travis Head World Cup 2023 : अनुभवी ट्रेव्हीस हेडचे ऑस्ट्रेलियन संघात आगमन

क्लब थ्रोमध्ये शेवटच्या चार खेळाडूंमध्ये सौदी अरेबियाचा राधी अली अलहराती चा समावेश होतात उर्वरित तीन खेळाडू हे भारताचेच होते. सौदीचा खेळाडू 23.77 मीटर थ्रो करत चौथ्या स्थानावर राहिला.

याचबरोबर भारताच्या पुरूष शूट पुट F11प्रकारात मोनू घानगासने (12.33m) कांस्य पदक पटकावले. महिला कॅनोए VL2 (नौका विहार) प्रकारात प्राची यादवने 1:03.147 वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.