Fire in Harare Sports Club : सध्या झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक २०२३ चे पात्रता सामने खेळले जात आहेत. झिम्बाब्वेमध्ये हे सर्व सामने खेळले जात असलेल्या दोन मैदानांपैकी एका मैदानाजवळ आग लागली, त्यामुळे खळबळ उडाली. हरारे स्पोर्ट्स क्लबला मंगळवारी रात्री आग लागली आणि घटनेनंतर लगेचच आयसीसीनेही चौकशी सुरू केली.
झिम्बाब्वे क्रिकेटने स्वतः एका निवेदनात पुष्टी केली की, मंगळवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता सामन्यांच्या दोन ठिकाणांपैकी एक असलेल्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आग लागली. मात्र, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची खात्री केली.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या दक्षिण-पश्चिम स्टँडच्या मागे आग लागली. घटनेनंतर लगेचच ICC च्या सुरक्षा पथकाने कारवाई केली. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेटसह या घटनेची चौकशी केली आणि ठरवले उर्वरित सामने त्याच मैदानावर नियोजितपणे पुढे जातील.
झिम्बाब्वे क्रिकेटने प्रसिद्ध केलेले निवेदन म्हटले की, काल रात्री मैदानाच्या दक्षिण-पश्चिम ग्रँडस्टँडच्या मागे असलेल्या हरारे स्पोर्ट्स क्लबला आग लागल्याची पुष्टी झिम्बाब्वे क्रिकेट करत आहे. हरारे सिटी फायर ब्रिगेडच्या तत्पर प्रतिसादामुळे आग ताबडतोब विझवण्यात आली. कोणालाही दुखापत झाली नाही. उद्याच्या हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता 2023 सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि तो नियोजित वेळेनुसार पुढे जाईल.
मंगळवारी झिम्बाब्वेने नेदरलँड्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. सहा तासांनंतर मैदानाच्या दक्षिण टोकापासून जाळ दिसत होता. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये अजूनही चार सुपर सिक्स सामने, आणखी तीन गट सामने आणि 9 जुलै रोजी अंतिम सामना खेळल्या जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.