Ashish Nehra : हरभजनची मागणी, गावसकरांचा पाठिंबा; आशिष नेहरा प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत?

Harbhajan Singh Rahul Dravid Ashish Nehra
Harbhajan Singh Rahul Dravid Ashish Nehra esakal
Updated on

Harbhajan Singh Rahul Dravid Ashish Nehra : भारताचे टी 20 वर्ल्डकप मधील आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी संघावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक माजी खेळाडू हे भारतीय टी 20 संघात मोठे बदल करण्याची मागणी करत आहेत. संघातील अनेक खेळाडूंच्या टी 20 भविष्याबाबत देखील माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने थेट संघाच्या प्रशिक्षक टीममध्येच मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. त्याने राहुल द्रविड ऐवजी एखादा तुलनेने तरूण आणि नुकताच टी 20 मधून निवृत्त झालेला प्रशिक्षक हवा असे मत नोंदवले.

Harbhajan Singh Rahul Dravid Ashish Nehra
IND vs ENG : अॅडलेडवर भारत हरला अन् 500 कोटींचा चुराडा झाला

हरभजन सिंग स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'टी 20 क्रिकेटमध्ये तुम्ही नुकताच निवृत्त झालेला प्रशिक्षक घेतला पाहिजे. यासाठी आशिष नेहराचा पर्याय देखील चांगला आहे. तर कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या ही माझी पसंती असेल.' गेल्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीने गुजरात टायटन्सला पदार्पणाच्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. आशिष नेहरा हा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला होता. विशेष म्हणजे राहुल द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत असून देखील ही मागणी होत आहे.

Harbhajan Singh Rahul Dravid Ashish Nehra
Sania Mirza: कोण आहे सानियाची स्विमिंगपूलवाली पाकिस्तानी सवत?

दरम्यान, भारताचे दिग्गज माजी सलामीवीर सुनिल गावसकर यांनी देखील हरभजनचे म्हणणे उचलून धरले. ते म्हणाले की, 'पहिल्याच प्रयत्नात आयपीएल विजेतेपद जिंकून देणारा हार्दिक पांड्या आपला पुढचा टी 20 कर्णधार असू शकतो. हार्दिक पांड्या नक्तीच भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. याचबरोबर काही खेळाडू निवृत्ती देखील घेऊ शकतात. या संघातील अनेक खेळाडू हे तिशी पार केलेले आहेत. ते भारतीय टी 20 संघातील आपल्या जागेबाबत पुन्हा विचार करतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.