हरभजनचा काय आहे निवृत्तीनंतरचा प्लॅन?

Harbhajan Singh Retirement Plan
Harbhajan Singh Retirement Plan esakal
Updated on

भारताचा अव्वल फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) गेल्या अनेक वर्षापासून भारतीय संघाकडून खेळलेला नव्हाता. अखेर हरभजन सिंगने आज (दि. २४ ) सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. तो अनेक वर्षापासून भारतीय संघाकडून खेळला नसल्याने तो चाहत्यांच्या विस्मृतीत गेला होता. त्यामुळे तो काही दिवसातच निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्याने निवृत्तीची घोषणा केलीच. हरभजन हा आयपीएलमध्येच (IPL) संघात किंवा संघाच्या बेंचवर दिसत होता. मात्र आता तो आयपीएलमध्येही वेगळ्या भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे. (Harbhajan Singh Retirement Plan)

Harbhajan Singh Retirement Plan
हरभजनची मोठी घोषणा; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हरभजन सिंग हा आयपीएलमधील एका बड्या फ्रेंचायजीसोबत सपोर्ट स्टाफ म्हणून जोडला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये (IPL) हरभजन अनेक फ्रेंचायजीकडून खेळला आहे. गेल्या आयपीएल हंगामात हरभाजन कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. मात्र त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. पीटीआयने हरभजन सिंग (Harbhajan Singh) काही आठवड्यात आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली होती.

आयपीएलमधील एका सूत्राने पीटीआयला नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की त्यांची फ्रेंचायजी हरभजन सिंगला सहयोगी सल्लागार म्हणून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी आयपीएल लिलावात (IPL Auction) हरभजन या संघाकडून सहभागही नोंदवू शकतो. हरभजन सिंग हा युवा खेळाडूंना मदत करण्यासाठी इच्छुक आहे. (Harbhajan Singh Retirement Plan

Harbhajan Singh Retirement Plan
व्हेगन कर्णधार 'बिर्याणी' निवडणार नाही का : जाफरचा सवाल

विशेष म्हणजे गेल्या हंगामात हरभजनने केकेआरचा (KKR) फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला मार्गदर्शन करण्यासाठी बराच वेळ दिला होता. सूत्र म्हणाले की, 'हरभजन हंगाम संपल्यानंतरच आपल्या निवृत्तीची घोषणा करणार होता. तो सध्या एका फ्रेंचायजीबरोबर चर्चा करत आहे. मात्र तो ज्यावेळी या फ्रेंचायजीबरोबर डील पक्की होईल त्यावेळीच यावर बोलणार आहे.' आज त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. याचा अर्थ त्याची फ्रेंचायजी बरोबरची बोलणी पक्की झाली असण्याची शक्यता आहे. याचबरोबर हरभजन सिंग आता समालोचकाच्या भुमिकेतही दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.