सीरीजमधून OUT होताच KL Rahul ची इमोशनल पोस्ट, 'स्वीकार करणे...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे आऊट झाला.
KL Rahul
KL Rahulesakal
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून कर्णधार केएल राहुन दुखापतीमुळे आऊट झाला आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

KL Rahul
बाबर आझमच्या शतकी वादळात ‘विराट’चे रेकॉर्ड ब्रेक

कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, मात्र दुखापतीमुळे तो यापुढे मालिकेचा भाग होणार नाही. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंत कर्णधार निवड केली आहे.

या घटनेनंतर के एल राहुल इमोशनल झाला आहे. त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच मायदेशात भारताचे नेतृत्व करायचे होते. पण..अशी खंत त्याने व्यक्त केली.

KL Rahul
‘चांगल्या परिस्थितीत...कॅप्टन्सी मिळताच पंतने व्यक्त केली खंत

काय म्हणाला केएल राहुल?

हे सर्व स्वीकार करणे अवघड आहे. मात्र, मी आज एक आव्हान स्विकारत आहे. पहिल्यांदाच मायदेशात भारताचे नेतृत्व करु शकलो नाही. पण माझे सहकारी खेळाडूंना पुर्णपणे पाठिंबा आहे. मला दिलेल्या पाठिंब्यामुळे तुमचे सर्वांचा मी आभारी आहे. ऋषभ आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा. लवकरच भेटू.. अशा आशयाची पोस्ट राहुलने लिहीली आहे.

निवड समितीने अद्याप कुलदीप यादव यांच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचे नाव दिलेले नाही. के एल राहुन आणि कुलदीप यादव दोन्ही क्रिकेटपटू आता एनसीएला अहवाल देतील जेथे वैद्यकीय संघ त्यांचे पुढील मूल्यांकन करेल आणि पुढील उपचारांबाबत निर्णय घेईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० सीरीजसाठी भारताचा संघ

ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पांड्या , रुतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.