Hardik Pandya Brilliant Catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात किवींचा संपूर्ण संघ 108 धावात गारद झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवत किवींचा निम्मा संघ 15 धावात गारद केला होता. आजच्या सामन्यात भारताने गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणही दमदार केले. याचा उत्तम नमुना उपकर्णधार हार्दिक पांड्याने सादर केला.
न्यूझीलंडला पहिल्या षटकापासूनच मोहम्मद शमीने त्रस्त केले होते. त्यानंतर सिराजने खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्याला हार्दिकची देखील साथ मिळाली. न्यूझीलंडचा 15 धावांवर असताना चौथा फलंदाज बाद झाला. हार्दिक पांड्याने सलामीवीर डेवॉन कॉन्वेला 7 धावांवर बाद केले. हार्दिकने आपल्याच गोलंदाजीवर कॉन्वेचा फॉलो थ्रूमध्ये अप्रतिम झेल टिपला.
हार्दिकचा मिडल स्टम्पवरचा चेंडूवर कॉन्वेने स्ट्रेट ड्राईव्ह केला. मात्र चेंडू बॅटवर थांबून आल्याने चेंडू हवेत उडाला होता. हार्दिकने फॉलो थ्रूमध्ये असतानाच डाव्या हात्याने झेल पकडत कोलांटी उडी मारली. हार्दिकसाठी हा झेल फारसा सोपा नव्हता तरी त्याने तो पकडत आपल्या फिल्डिंग स्किलचे प्रदर्शन घडवले.
हार्दिक पांड्याने आजच्या सामन्यात 6 षटकात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने सेट झालेल्या मिचेल सँटनरला देखील 27 धावांवर बाद केले.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या.
हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.