Shubman Gill : हार्दिक पांड्या कर्णधार मग काय गुजरात टायटन्सच्या खेळाडूचे टी 20 पदार्पण पक्के!

New Zealand Vs India Shubman Gill Debut
New Zealand Vs India Shubman Gill Debut esakal
Updated on

New Zealand Vs India Shubman Gill Debut : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून ( दि.18) सुरू होत आहे. या दौऱ्यावर भारताने टी 20 वर्ल्डकप संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली असून संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. सध्या हार्दिक पांड्या हा भारतीय टी 20 संघाचे पूर्णवेळ कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्याच्यासाठी न्यूझीलंड दौरा ही एक परीक्षा असणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकून देणाऱ्या हार्दिकचा भाव चागंलाच वधारला आहे. आता त्याच्यात नेतृत्वाखालील भारतीय संघात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल आपले टी 20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.

New Zealand Vs India Shubman Gill Debut
FIFA Revenue Model : क्लब केंद्रीत फुटबॉल, तरी फिफा एवढा बक्कळ पैसा कुठून कमवतं?

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल हा गेल्या काही काळापासून भारतीय संघासोबत आहे. त्याने वनडे आणि कसोटीत भारतासाठी अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. मात्र त्याला अजूनपर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये भारताची जर्सी घालण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आता तो योग जुळून येताना दिसतोय. तो आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना हा न्यूझीलंडविरूद्ध खेळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे गिल सलामीवीर म्हणून संघात येऊ शकतो.

New Zealand Vs India Shubman Gill Debut
Ravi Shastri : 'ब्रेकची काय गरज...', शास्त्री राहुल द्रविडवर भडकले

शुभमन गिलच्या पदार्पणासाठी खास आकडा पाहतोय वाट

जर न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शुभमन गिलला पादर्पणाची संधी मिळाली तर भारतीय क्रिकेट इतिहासात त्याचे नाव खास असणार आहे. कराण आतापर्यंत भारतीय संघाकडून 99 खेळाडूंनी टी 20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्यामुळे शुभमन गिलने जर पदार्पण केले तर तो भारताचा टी 20 खेळणारा शंभरावा खेळाडू ठरले.

शुभमन गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना आपली क्षमता दाखवून दिली होती. 23 वर्षाचा शुभमन गिल हा मोठी खेळी करण्यात तरबेज आहे. गुजरातच्या विजेतेपदात शुभमन गिलचा मोलाचा वाटा राहिला आहे. शुभमन गिलने भारताकडून कसोटी आणि वनडे सामन्यातही मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याने 11 कसोटी सामन्यात 579 धावा केल्या असून 12 वनडे सामन्यात त्याने 579 धावा केल्या आहेत. गिलने वनडे क्रिकेटमध्ये शतक देखील ठोकले आहे.

New Zealand Vs India Shubman Gill Debut
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.