Hardik Pandya Ind vs Nz : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिकला भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीने तो निराश झाला आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी हार्दिक म्हणाला की, टीम इंडियाला आपला पराभव यश म्हणून घेण्याची गरज आहे. संघाला पुढे जाण्याची गरज आहे. जसे आपण सामने जिंकतो तसे पराभूत होतो. त्याच पद्धतीने आता हा पराभव स्वीकारण्याची गरज आहे.
हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
तत्पूर्वी, हार्दिक म्हणाला की 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा रोडमॅप सुरू झाला आहे, परंतु सध्या संघाचे संपूर्ण लक्ष न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. गेल्या काही वर्षात न्यूझीलंड हा एक चांगला संघ आहे, त्यांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि एक संघ म्हणून तुम्हाला आव्हान दिले आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना संघात आपली योग्यता सिद्ध करण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी मिळेल आहे.
टीम इंडिया वेलिंग्टन येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 ते 5 या वेळेत सराव करेल. न्यूझीलंड दौऱ्यात भारताला 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 संघ -
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.