..तर हार्दिक पांड्याला ODI आणि T20 संघातूनही डच्चू

जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर मर्यादित षटकांच्या सामन्यातही त्याला संधी देणं अयोग्य ठरले, असे त्यांनी म्हटले आहे.
hardik pandya
hardik pandya Google
Updated on
Summary

जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर मर्यादित षटकांच्या सामन्यातही त्याला संधी देणं अयोग्य ठरले, असे त्यांनी म्हटले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आणि इंग्लंड (England) विरुद्धच्या कसोटी (Test) सामन्यासाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे माजी सदस्य राहिलेया सरनदीप सिंह यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. एवढेच नाही तर हार्दिक पांड्या हा वनडे आणि टी-20 संघात स्थान देण्याबाबतही कठोर निर्णय घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर मर्यादित षटकांच्या सामन्यातही त्याला संधी देणं अयोग्य ठरले, असे त्यांनी म्हटले आहे. (hardik pandya does not fit into playing xi if he can not bowl says sarandeep singh)

पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या हार्दिक पांड्यावर 2019 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर भारतीय संघात कमबॅक केल्यानंतर हार्दिक पांड्या गोलंदाजी पूर्वीप्रमाणे गोलंदाजीसाठी उपयुक्त ठरत नाही. गोलंदाजी करत नसल्यामुळेच त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेला मुकावे लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत बीसीसीआय निवड समितीच्या बॉडीमध्ये असलेल्या सरदीप यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. त्याशिवाय पृथ्वी शॉला संघा जागा न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले.

hardik pandya
WTC : संघात स्थान न मिळालेला भुवी करतोय निवृत्तीचा विचार

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे माजी फिरकीपटू सरनदीप म्हणाले की, हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले नाही हे समजू शकते. शस्त्रक्रिया झाल्यापासून तो नियमित गोलंदाज करु शकत नाही. वनडेत 10 आणि टी 20 मध्ये 4 षटकांचा कोटा पूर्ण करु शकत नसेल तर मर्यादित षटकासह छोट्या फॉर्मेटमध्येही त्याला संघात स्थान देणे अयोग्यच ठरेल. केवळ फलंदाजीच्या जोरावर त्याला संघात स्थान देता येणार नाही. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर टीमचे संतुलन बिघडेल, असेही ते म्हणाले.

hardik pandya
ह्रतिकचा दाखला देत जाफरने घेतली वॉनची शाळा

हार्दिक पांड्याला खेळवायचे असेल तर संघावा अतिरिक्त गोलंदाजासह मैदानात उतरावे लागेल. यापरिस्थितीत सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजावर खाली बसण्याची नामुष्की ओढावेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात आपण त्याचा परिणाम पाहिला आहे. सध्याच्या घडीला टीम इंडियाकडे वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जड्डू (रविंद्र जडेजा) यांच्यारुपात अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. हार्दिकची जागा घेण्याची या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, असे सरनदीप यांनी म्हटले आहे.

पृथ्वीला संधी द्यायला पाहिजे होती. सेहवागप्रमाणे दमदार सुरुवात करुन देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूकडे अल्पावधीत दुर्लक्ष करणे बरोबर नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. तांत्रिक चुका सुधारल्यानंतर त्याला संधी द्यायला हवी होती, असे मत सरनदीप यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.