इंडियन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा भाग होणार आहे. हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरला सुरुवात केली होती.
कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे. तो त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये परत येऊ शकतो. त्यामुळे कोच आशिष नेहराची डोकेदुखी वाढली आहे, करण अशा स्थितीत गुजरातचे कर्णधार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ 2022 मध्ये आला, आणि पहिल्याच हंगामात विजेतेपदवर नाव कोरले. दुसऱ्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्येही या संघाने दमदार कामगिरी केली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. जिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.
या दोन सत्रांनंतर पांड्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले. आणि टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी त्याला पर्याय म्हणूनही पाहिले गेले. त्याला टी-20 संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले. पांड्या मुंबईत परतला, तर रोहितला पर्याय म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते, पण गुजरातमध्ये पंड्याला पर्याय कोण, हा प्रश्न आहे.
शुभमन गिल होणार कर्णधार?
गुजरात संघावर नजर टाकली तर शुभमन गिलला कर्णधार बनवता येईल. हा युवा खेळाडू असून त्याने बॅटने आपली प्रतिभा दाखवली आहे. भविष्य पाहता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. फ्रँचायझीकडे गिलपेक्षा चांगला पर्याय नाही. त्याच्याकडे कर्णधारपदाची क्षमताही आहे. फ्रँचायझी त्याला तयार करण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबू शकतात.
दूसरा पर्याय म्हणजे, कर्णधारपद राशिद खानकडे सोपवून गिलला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. पांड्या कर्णधार असताना रशीद संघाचा उपकर्णधार होता. त्याने काही प्रसंगी संघाचे नेतृत्वही केले. अशा परिस्थितीत फ्रँचायझी काही हंगामांसाठी रशीदकडे कर्णधारपद आणि गिलकडे उपकर्णधारपद सोपवण्याची शक्यता आहे.
जेणेकरून गिलला स्वतःला नेतृत्वाच्या भूमिकेत सामावून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि नंतर तो संघाची कमान घेऊ शकेल. या दोघांशिवाय सध्याच्या सेटअपमध्ये संघाकडे कर्णधारपदाचा पर्याय दिसत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.