Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकण्याचा दाट शक्यता आहे. तो अजूनही घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. मात्र तो आयपीएलपूर्वी फिट होईल असं सांगितलं जात आहे. ही माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्याने चार सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र 19 ऑक्टोबरला झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात चेंडू आडवताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित वर्ल्डकपला मुकला होता.
तेव्हापासून हार्दिक पांड्या कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो 5 टी 20 सामन्यांच्यी ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका देखील मुकला होता. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील तो खेळला नाही.
हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व केलं होते. तर वनडेमध्ये केएल राहुलने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. रोहित शर्माला वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघ आयसीसी टी 20 वर्ल्डकपपूर्वी अफगाणिस्तानविरूद्ध शेवटची टी 20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 11 ते 17 जानेवारी दरम्यान भारतात होईल. पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार संघाचे नेतृत्व करायचा मात्र तो देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाची धुरा कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.