Hardik Pandya : वर्ल्डकपमधील अजून काही सामने तरी... हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट

Hardik Pandya
Hardik Pandya esakal
Updated on

Hardik Pandya : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या हा बंगळुरूमधून मुंबईत दाखल होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे तो श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळण्याची आशा निर्माण झाली होती.

मात्र बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या हा अजून काही सामने तरी मैदानावर उतरू शकणार नाही.

Hardik Pandya
David Willey : वर्ल्डकपनंतर थांबणार... इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'हार्दिक पांड्याची दुखापत फार गंभीर नाही. त्याच्या घोट्याच्या लिगामेंटला मायनर टीअर आहे. तो चांगल्या पद्धतीने रिकव्हर होत आहे. तो लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात संघात परतण्याची शक्यता आहे. याचबरोबर तो थेट सेमी फायनल राऊंडमध्ये खेळण्याची देकील दाट शक्यता आहे.'

भारताने आतापर्यंतच्या लीग स्टेजमधील आपले सहाच्या सहा सामने जिंकले आहेत. त्यांचे सेमी फायनलमधील तिकीट जवळपास निश्चित आहे.

अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दोन बदल केले. संघात पाचवा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी तर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला.

Hardik Pandya
Suryakumar Yadav : सूर्या कॅमेरा घेऊन पोहचला मरीन ड्राईव्हवर... बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

हार्दिक पांड्याचा अनुपस्थितीत मोहम्मद शमीने दोन सामन्यात 9 विकेट्स घेत मोठा धमाका केला. त्यामुळे त्याचे पुढील काही सामन्यात तरी प्लेईंग 11 मधील स्थान अबाधित आहे. याचबरोबर सूर्यकुमार यादवने देखील इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 49 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे त्याला देखील संघाबाहेर ठेवणे रोहित अन् राहुलला जड जाणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.