Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि नुकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालेला हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे अफगाणिस्तान आणि आयपीएल दौऱ्याला देखील मुकणार असल्याचे वृत्त आलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानविरूद्ध मायदेशात होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तसेच तो आयपीएलचा हंगाम देखील खेळण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सुत्रांनी सांगितले की, 'हार्दिक पांड्या हा घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो प्रत्येक दिवशी सराव करत आहे.' मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून 15 कोटी रूपये देऊन ट्रेडिंग विंडोद्वारे आपल्या गोटात खेचलं. त्यानंतर मुंबईने हार्दिक पांड्याला कर्णधार देखील केलं त्यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो वर्ल्डकपमधील पुढचे सामने खेळू शकला नव्हता. याचबरोबर तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याला देखील मुकला.
दोन दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या या दुखापतीतून अजून सावरलेला नसून तो अफगाणिस्तान आणि आयपीएलचा हंगाम देखील खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवणारे वृत्त आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या फिट आहे आणि रोज वर्कआऊट करतोय. तो आयपीएलमधून बाहेर होणार या अफवा आहेत. आयपीएल 2024 ला अजून चार महिने आहेत. त्यामुळे आता काहीही बोलणं हे फक्त शक्यता आहेत.'
पांड्याने इन्स्टाग्रावर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतोय. बीसीसीआयच्या सूत्रांनी देखील हार्दिक पांड्या लवकच फिट होऊन परतणार आणि आयपीएल देखील खेळणार असं सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.