साध्याभोळ्या कोचची थोडी गंमत; हार्दिक पांड्याचं वक्तव्य चर्चेत

IPL 2022
IPL 2022 Sakal
Updated on

IPL च्या यंदाच्या हंगामात दोन नव्या संघांची एन्ट्री झालीये. लखनऊ सुपरजाइंट्स आणि गुजरात टायटन्स आपल्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. 26 मार्चपासून आयपीएलचे बिगूल वाजणार असून नव्या फ्रेंचायझींनी कंबरही कसली आहे. दरम्यान स्पर्धेआधी गुजरात सुपर जाएंट्सच्या ताफ्यात हलक्या फुलक्या विनोदी खेळीसह संघातील वातावरण फुलवण्याचा प्रयत्नही सुरु झाल्याचे दिसते. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गुजराज टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाचे कोच आणि माजी जलदगती गोलंदाज आशीष नेहरासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरुये.

हार्दिक पांड्याने केली कोचची गंमत

गुजरातच्या संघाने आयपीएलच्या हंगामासाठी मेगा लिलावात जबरदस्त शॉपिंग केलीच. त्याशिवाय लिलावा आधी हार्दिक पांड्या, फिरकीपटू राशिद खान आणि युवा फलंदाज शुभमन गिल या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. संघाने प्रशिक्षकाची जबाबदारी आशीष नेहरावर सोपवली आहे.

IPL 2022
पंतची दिमाखदार कामगिरी, दिग्गजाला बसली सणसणीत चपराक

स्पर्धेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी हार्दिक पांड्याने कोच आशिष नेहरासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर कोचवाली फिलिंग येत नाही. नेहराचे व्यक्तिमत्व हे विनोदी आहे. तो खेळाडूंना स्वातंत्र्य देईल. त्याच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे, असे हार्दिक पांड्याने म्हटले आहे.

टीमने काही दिवसांपूर्वीच लॉन्च केली होती जर्सी

काही दिवसांपूर्वीच एका खास कार्यक्रमाचे आयोजन करुन गुजरातच्या संघाने आपलीय जर्सी लॉन्च केली होती. हार्दिक पांड्यापासून ते क्रिकेट चाहत्यांमध्ये या जर्सीला चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

2022 साठी असा आहे गुजरात जाएंट्सचा संघ

हार्दिक पांड्या(कर्णधार), राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदारांगनी, राहुल तेवातिया, नूर अहमद, आर साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नालकंडे, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेविड मिलर, रिद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंह, वरुण एरोन, बी साई सुदर्शन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.