Hardik Pandya Ruled Out Of Australia T20I : वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंची बुधवारी घोषणा करण्यात येणार आहेत.
मात्र याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचा भाग असणार नाही. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हार्दिक पांड्या कधी करणार पुनरागमन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने हार्दिक पांड्याला 6 ते 8 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली, त्यानंतर अष्टपैलू खेळाडूला मैदान सोडावे लागले.
हार्दिक पांड्याच्या वर्ल्ड कप संघात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका डिसेंबरमध्ये होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्दिक पांड्या पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मिळणार विश्रांती...
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसह अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल या युवा खेळाडूंना संधी दिल्या जाऊ शकते.
याशिवाय भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडसह उर्वरित कोचिंग स्टाफलाही विश्रांती देण्यात येणार आहे. या काळात व्हीव्हीएल लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.