Hardik Pandya : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का! उपकर्णधार स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

Hardik Pandya ruled out of World Cup 2023
Hardik Pandya ruled out of World Cup 2023sakal
Updated on

Hardik Pandya ruled out of World Cup 2023 : भारतात सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही तो केवळ तीन चेंडू टाकू शकला होता. त्यांच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता.

ICC ने हार्दिकला वर्ल्ड कपमधून वगळण्याची पुष्टी केली. भारताला सध्या साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठीही पात्र ठरला आहे.

गेल्या महिन्यात पुण्यात बांगलादेश विरुद्ध सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्धला वर्ल्ड कपचा अनुभव नाही आणि तो प्रथमच वर्ल्ड कप संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आणि तो एनसीए बंगळुरू येथे होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

टीम इंडिया या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहित ब्रिगेडने 7 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. त्याचे 14 गुण आहेत आणि तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()