Video : धोनी स्टाईलमध्ये सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला, माही भाईकडून...

भारतीय डावातील 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने मारलेल्या षटकाराने भारतीयांना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली.
 hardik pandya said after hitting six learned a lot from ms dhoni
hardik pandya said after hitting six learned a lot from ms dhoni
Updated on

Hardik Pandya Asia Cup 2022 : भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. पाकिस्तानसोबतच्या या सामन्यात हार्दिक पांड्याने मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर हार्दिक पंड्या स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, मी फिनिशर म्हणून माही भाईकडून खूप काही शिकलो आहे. हार्दिकने 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि तो 'मॅन ऑफ द मॅच'ही ठरला.

भारतीय डावातील 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने मारलेल्या षटकाराने भारतीयांना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. महेंद्रसिंग धोनीही अशाप्रकारे सामने संपवायचा, हे चाहत्यांना आठवले. सामन्यादरम्यान तो संयम बाळगतो आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असेही हार्दिक म्हणाला. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजा 29 चेंडूत 35 धावा करून बाद झाला तेव्हा दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. कार्तिक सामना संपवेल असे वाटत होते, पण त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला सिंगल दिली आणि तो नॉन-स्ट्रायकर एंडला आला.

तिसर्‍या चेंडूवर हार्दिकने कव्हर ड्राईव्ह मारला, पण इथे एक धाव शक्य झाल्यानंतरही पांड्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवला आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.