Hardik Pandya Second Wedding : ना सात फेरे.. ना मंगलाष्टकं.. पांड्याने कसं केलं दुसरं लग्न?

Hardik Pandya Second Wedding
Hardik Pandya Second Wedding esakal
Updated on

Hardik Pandya Second Wedding : भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने यंदाचा व्हॅलेंटाईन डे सर्वात हटके साजरा केला. हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांनी व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. हार्दिकचा हा दुसरा विवाह सोहळा उदयपूर येथे संपन्न झाला. यासाठी हार्दिकने एक पॅलेस बुक केला होता. या लग्नाला पांड्या - स्टॅन्कोविक कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. विवाह सोहळा हिंदू पद्धतीने नाही तर ख्रिश्चन पद्धतीने झाला.

Hardik Pandya Second Wedding
Chetan Sharma: निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा स्टींग ऑपरेशनमध्ये चांगलेच अडकले; दुसऱ्या संधीचं केलं मातेरं

हार्दिक पांड्याने आपल्या दुसऱ्या शाही विवाहाचे फोटो शेअर करत लिहिले की, 'आम्ही तीन वर्षापूवी घेतलेली शपथ पुन्हा एकदा घेतली. प्रेमाच्या या बेटावर आम्ही आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला. प्रेमाचा उत्सव साजरा करताना कुटुंब आणि मित्रांनी दिलेली साथ पाहून मी धन्य झालो.'

Hardik Pandya Second Wedding
Shubman Gill : अखेर समोर आलं? ‘या’ मुलीला डेट करतोय शुभमन गिल

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये लॉकडाऊन असताना नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. त्यावेळी त्याने पारंपरिक हिंदू पद्धतीने सात फेरे घेऊन लग्न केले होते. मात्र त्यावेळी लॉकडाऊन असल्याने हा विवाह सोहळा साध्या आणि अत्यंत कौटुंबिक पद्धतीने झाला होता.

बहुदा त्यामुळेच हार्दिक आणि नताशा यांनी दुसऱ्यांदा लग्नाचा घाट घातला. यावेळी त्यांनी राजस्थान मधील एक पॅलेसच बुक करत आपला हा विवाहसोहळा शाही केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा मुलगा अगस्त देखील साक्षीला होता. अगस्तच्या जन्म देखील 2020 मध्येच झाला होता.

हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या लग्नावर नवविवाहित केएल राहुलने देखील अभिनंदन मित्रा अशी प्रतिक्रिया दिली. एका चाहत्याने हार्दिकने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट केली की लेडी लक क्वीन आपल्या किंगसोबत!

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()