Hardik Pandya IND vs WI : 6, 6, 6, 6, 6.. टीम हार्दिकने अखेर 'दर्जा' राखला; कर्णधारासह गिल, किशन अन् संजूनेही धुतले

West Indies vs India 3rd ODI
West Indies vs India 3rd ODI esakal
Updated on

West Indies vs India 3rd ODI : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात अखेर आपल्या बॅटिंगचा दम दाखवलाच! नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या विंडीजचा निर्णय हार्दिकच्या नेतृत्वातील भारतीय संघाने चुकीचा ठरवला. भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. हार्दिकने 52 चेंडूत नाबाद 70 धावा ठोकल्या. त्यात 4 चौकार आणि तब्बल 5 षटकारांचा समावेश होता.

भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. शुभमन गिलने 85, इशान किशनने 77 तर हार्दिक पांड्याने 70 धावांचे योगदान दिले. तर संजू सॅमसनने 51 धावा करत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले.

भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 85 तर इशान किशनने 77 धावा केल्या. या दोघांनी 143 धावांची सलामी दिली. संजू सॅमसनने 51 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी करत भारताची धावगती वाढवली. हार्दिक पांड्याने 52 चेंडूत नाबाद 70 धावा ठोकत भारताला 350 पार धावसंख्या उभारून दिली. विंडीजकडून रोमारियो शेफर्डने 2 विकेट्स घेतल्या.

West Indies vs India 3rd ODI
Jaydev Unadkat ODI : हार्दिक पांड्याच्या एका निर्णयाने तब्बल 3540 दिवसांचा दुष्काळ संपला

विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मालिकेत भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत सलग तिसरी अर्धशतकी खेळी केली. त्याच्या साथीला असलेल्या शुभमन गिलने आधी किशनला बॉल टू रन्स करत साथ दिली.

या दोघांनी 143 धावांची शतकी सलामी देत भारतीय संघाच्या मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. मात्र इशान दिशन 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋतुराज गायकवाड 8 धावांची भर घालून परतला.

West Indies vs India 3rd ODI
BCCI Title Sponsorship : बीसीसीआयनं पैशाचा तोरा कमी करत टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर काढलं खरं मात्र...

मात्र त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने आल्या आल्या आक्रमक फटके मारत भारताची धावगती कमी येऊ दिली नाही. त्याने शुभमन गिलसोबत 69 धावांची भागीदारी रचत भारताला 200 पार पोहचवले. मात्र सॅमसन 41 चेंडूत 51 धावा करून बाद झाला.

संजूनंतर हार्दिक पांड्याने शुभमन गिलसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र गिल 85 धावा करून बाद झाला. त्याचे शतक हुकले. गिलनंतर आलेल्या सूर्याने हार्दिकला चांगली साथ देत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचत संघाला 300 चा टप्पा पार करून दिला.

मात्र स्लॉग ओव्हरमध्ये सूर्या 30 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. यानंतर शेवटच्या तीन षटकात हार्दिक पांड्याने आपला टॉप गिअर टाकत भारताला 351 धावांपर्यंत पोहचवले. हार्दिकने 5 षटकार आणि 4 चौकार मारत 52 चेंडूत नाबाद 70 धावा ठोकल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.