Hardik Pandya : भारत सेमी फायनलमध्ये पोहचला मात्र या हार्दिक पांड्याचं करायचं काय?

Hardik Pandya Strike Rate T20 World Cup 2022
Hardik Pandya Strike Rate T20 World Cup 2022 esakal
Updated on

Hardik Pandya Strike Rate T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या सुपर 12 मधील शेवटच्या सुपर संडेला पहिल्याच सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव करत सर्वांना झोपेतून खडबडून जागे केले. नेदरलँडच्या या विजयाने थेट पाकिस्तानला फायदा झाला असला तरी अप्रत्यक्षरित्या भारत देखील लाभार्थी ठरला. भारत झिम्बाब्वेचा सामना खेळण्यापूर्वीच सेमी फायनलमध्ये गेला. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात भारताने टेन्शन फ्री गेम खेळणे गरजेचे होते. मात्र भारताचे मोठमोठे फलंदाज पुन्हा एकदा धारातीर्थी पडले. दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यावर डाव सावरण्याची जबाबदारी असताना हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा करून फक्त 2 चौकार मारत माघारी फिरला. यावरून हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.

Hardik Pandya Strike Rate T20 World Cup 2022
Suryakumar Yadav : 'सूर्या' अभी जिंदा है! मोठ्या पडझडीनंतर भारताला सावरले

आयपीएलचा 2022 चा हंगाम गाजवणाऱ्या हार्दिक पांड्याने नवख्या गुजरात टायटन्सला विजेतेपदापर्यंत पोहचवले. त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करत काही आकर्षक खेळी देखील खेळल्या. त्यामुळे तो टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा मॅच फिनिशर म्हणून संघात महत्वाची भुमिका बजावले असा विश्वास सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.

मात्र पाकिस्तानविरूद्धची 37 चेंडूत केलेली 40 धावांची खेळी सोडली तर हार्दिक पांड्या सुपर 12 मध्ये फेलच झाला आहे. त्याला इतर सामन्यात आपले स्ट्राईक रेट साधे 100 च्या पुढे नेता आलेले नाही. यावरूनच हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.

एका चाहत्याने 'अपयशी ठरणारा हार्दिक पांड्या हा भारतासाठी चांगले लक्षण नाही. जर आपल्याला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर हार्दिक पांड्याला मोठी खेळी करावी लागले. चॅम्प 2 मोठ्या खेळी प्लीझ.' अशी प्रतिक्रिया दिली.

Hardik Pandya Strike Rate T20 World Cup 2022
Suryakumar Yadav : सूर्याने इतिहास रचला! एका वर्षात हजारी मनसबदारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.