VIDEO | NZ vs PAK : तुफान एक्सप्रेस! हारिसच्या वेगवान चेंडूने फिलिप्सच्या बॅटचे झाले तुकडे

Haris Rauf Speedy Delivery BreaksGlenn Phillips Bat
Haris Rauf Speedy Delivery BreaksGlenn Phillips BatESAKAL
Updated on

New Zealand vs Pakistan Final : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने ट्रायसिरीजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. वर्ल्डकपला सामोरे जाण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघासाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणार ठरणार आहे. पाकिस्तानने मोहम्मद नवाझने केलेल्या 22 चेंडूत केलेल्या 38 धावांच्या जोरावर 164 धावांचे आव्हान पार करत विजय मिळवला. पाकिस्तानकडून हारिस रौऊफने किफायतशीर मारा करत न्यूझीलंडला 20 षटकात 7 बाद 163 धावात रोखले.

Haris Rauf Speedy Delivery BreaksGlenn Phillips Bat
Ravi Shastri : गांगुलीला अध्यक्षपदावरून डच्चू, आनंदी शास्त्री म्हणाले आयुष्यात काही...

दरम्यान, हारिस रौऊफने न्यूझीलंडविरूद्ध वेगवान मारा करत त्यांच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. विशेष म्हणजे सामन्याच्या सहाव्या षटकात चौथ्या चेंडूवर हारिस रौऊफने ग्लेन फिलिप्सच्या बॅटचे तुकडेच केले. रौऊफने 143 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला. तो चेंडू फिलिप्सच्या बॅटच्या टोला लागला. चेंडूचा वेग इतका होता की बॅटच्या ठिकऱ्या उडाल्या.

Haris Rauf Speedy Delivery BreaksGlenn Phillips Bat
Shubman Gill | VIDEO : शुभमन तेंडुलकरांच्या नाही तर खानांच्या साराला करतोय डेट?

हारिस रौऊफने फायनल सामन्यात आपल्या चार षटकात फक्त 22 धावा देत दोन विकेट्स देखील मिळवल्या. त्याने डेवॉन कॉनवॉय आणि इश सोधीची शिकार केली. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून केन विलियमसनने 59 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 163 धावा केल्या. न्यूझीलंडने ठेवलेल्या 164 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने संथ सुरूवात केली. मात्र त्यानंतर मोहम्मद नवाझ आणि हैदर अली यानी 56 धावांची आक्रमक भागीदारी रचत सामन्यावर पकड निर्माण केली.

पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझने नाबाद 38 तर इफ्तिकार अहमदने नाबाद 25 धावा करत पाकिस्तानचा विजय साकारला. पाकिस्तान आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आपला सलामीचा सामना भारतासोबत 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.