Harmanpreet Kaur BANW vs INDW 3rd ODI : बांगलादेश महिला क्रिकेट संघाने भारताविरूद्धचा तिसरा वनडे सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 226 धावांचे आव्हान ठेवले होते. (Bangladesh Women's Cricket Team Vs India Women's Cricket Team)
मात्र भारताचा संपूर्ण संघ तीन चेंडू शिल्लक असतानाच 225 धावात गारद झाला. तीन वनडे सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत होती. तिसरा वनडे सामना टाय झाल्यामुळे भारत आणि बांगलादेशला संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात आले. (Women's Cricket)
मात्र या सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) जाम भडकली होती. तिने सामन्यातील वादग्रस्त अंपायरिंगवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
हरमनप्रीत सामन्यानंतर बोलताना म्हणाली, 'मला असे वाटते की या सामन्यातून बरच काही शिकण्यासारखं होतं. क्रिकेटचं सोडाच मात्र ज्या प्रकारे या सामन्यात अंपायरिंग झालं ते खूप धक्कादायक होतं. पुढच्यावेळी ज्यावेळी आम्ही बांगलादेशमध्ये येऊ त्यावेळी या प्रकारच्या अंपायरिंग कसं हाताळायचं याची तयारी करून येऊ.'
हरमन सामन्याबद्दल म्हणाली की, 'बांगलादेशने अत्यंत चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. परिस्थितीनुसार त्यांनी आपल्यात बदल केले. त्यांना अत्यंत महत्वाच्या अशा एकेरी धावा घेतल्या. आम्ही काही धावा दिल्या मात्र ज्यावेळी आम्ही फलंदाजी करत होतो त्यावेळी सामन्यावर आमची पकड मजबूत होती. मात्र मी जसं म्हणाले की ज्या प्रकारे अंपायरिंग झालं, काही निर्णय तर खूपच निराशाजनक होते.'
'हरलीन चांगल्या टचमध्ये होती. त्यामुळे आम्ही तिला वरच्या फळीत खेळवले. तिने या संधीचं सोनं केलं. जेमिमाह देखील संपूर्ण सामन्यात चांगली खेळत होती. हा एक चांगला सामना होता. सामन्यातून खूप काही शिकायला मिळालं.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.