Harmanpreet Kaur : विक्रम तर होत राहतील मात्र... हरमनने रोहितचा कित्ता गिरवला, इंग्लंडला तिसऱ्याच दिवशी गार केलं

Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur esakal
Updated on

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. भारतीय महिला संघाने महिला कसोटी सामन्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने इंग्लंडचा एकमेव कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी पराभव केला.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 136 धावात गुंडाळला होता. त्यानंतर दुसरा डाव 186 धावांवर घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतानाही तिने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

Harmanpreet Kaur
Rohit Sharma Vs Hardik Pandya : वर्ल्डकप सुरू असतानाच मुंबई इंडियन्सनं कर्णधार बदलाचा बॉम्ब फोडला होता?

विशेष म्हणजे हमनप्रीतने महिला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही शतक किंवा अर्धशतक ठोकलेलं नाही. इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत तिला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. ती 44 धावांवर खेळत होती. मात्र तरी देखील हरमनप्रीत कौरने डाव घोषित केला.

सामन्यानंतर हरमनप्रीतला या बाबत विचारण्यात आलं. त्यावेळी हरमनप्रीत म्हणाली की, 'आजच्या दिवसातील पहिली 40 मिनिटे खूप महत्वाची होती. आम्ही विचार केला की जर आम्ही 3 ते 4 विकेट्स घेतल्या तर सामना जिंकायला आपल्याला मदतच होईल. वैयक्तिक माईल स्टोन माझ्यासाठी संघाच्या ध्येयापेक्षा महत्वाचे नाहीत. मला माहिती आहे की भविष्यात मला कसोटीत शतक किंवा अर्धशतक ठोकण्याची संधी नक्की मिळेल.'

Harmanpreet Kaur
Rohit Sharma : वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी, 6 टी-20 शतके...; तरी MI ने रोहितकडून का काढून घेतले कर्णधारपद?

भारताच्या 34 वर्षाच्या हरमनप्रीत कौरने रोहित शर्मासारखं सेल्फलेस खेळत संघासमोर एक मोठं उदाहरण ठेवलं. याचबरोबर हरमनने सर्व खेळाडूंनी योजनेनुसार कामगिरी केल्याचं म्हणत सर्वांची पाठ थोपटली. आम्ही सामना कशा प्रकारे जिंकू शकतो हे दाखवून दिलं. सर्व काही योजनेनुसार झालं. याच श्रेय संघातील सर्व खेळाडूंना जातं. प्रत्येक खेळाडू मग तो फलंदाज असो किंवा गोलंदाज त्यांनी आपली भुमिका योग्य प्रकारे निभावली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.