Team India : ‘ही’ आहेत 2023 वर्ल्डकपसाठी BCCI ने शॉर्टलिस्ट केलेली टीम इंडियातील नावं...

World Cup 2023 BCCI Shortlisted Player Name Harsha Bhogle
World Cup 2023 BCCI Shortlisted Player Name Harsha Bhogleesakal
Updated on

World Cup 2023 BCCI Shortlisted Player Name Harsha Bhogle : बीसीसीआयची रिव्ह्यू मिटिंग झाल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. बीसीसीआय खेळाडूंच्या दुखापतीबाबत आणि त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत खूप गांभीर झाली आहे. खेळाडूंवर क्रिकेटचा अतीताण येऊ नये म्हणून आयपीएल फ्रेंचायजींनाही बीसीसीआयने काही निर्देश दिले आहेत.

World Cup 2023 BCCI Shortlisted Player Name Harsha Bhogle
Team India : बीसीसीआयच्या नव्या पॉलिसीने IPL संघाची झालीये चांगलीच अडचण; रोहित, बुमराह, हार्दिक आता...

भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 ला अवघे 10 महिनेच शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान, बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना तंदुरूस्त ठेवण्यासाठी आधीच 23 खेळाडूंचा एक संच तयार केला असून हे खेळाडू पुढचे 10 महिने रोटेशनपद्धतीने खेळणार आहेत. तसं बघायला गेलं तर या 23 खेळाडूंकडे भारताचा संभाव्य वर्ल्डकप संघ म्हणून देखील पाहिले जात आहे.

बीसीसीआयने जरी 23 खेळाडूंचा संच केल्याची माहिती दिली असली तरी हे 23 खेळाडू कोण याचा उलगडा केलेला नाही. त्यामुळे सर्वजण या यादीत कोणाचा समावेश असेल याचा अंदाज बांधत आहेत. असाच अंदाज क्रिकेट समीक्षक आणि वरिष्ठ समालोचक हर्षा भोगले यांनी देखील बांधला आहे. हर्षा भोगले यांनी आपल्या 23 खेळाडूंच्या यादीत कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि संजू सॅमसन यांचा समावेश केला आहे. याचबरोबर रजत पाटीदार आणि उमरान मलिकचा देखील समावेश आहे. मात्र त्यांनी शिखर धवनचा समावेश केलेला नाही.

हर्षा भोगले यांची संभाव्य 23 खेळाडूची यादी

  • रोहित शर्मा

  • केएल राहुल

  • शुभमन गिल

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • इशान किशन

  • ऋषभ पंत

  • सूर्यकुमार यादव

  • संजू सॅमसन

  • हार्दिक पांड्या

  • अक्षर पटेल

  • रविंद्र जडेजा

  • वॉशिंग्टन सुंदर

  • कुलदीप यादव

  • युझवेंद्र चहल

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद शमी

  • अर्शदीप सिंग

  • प्रसिद्ध कृष्णा

  • मोहम्मद सिराज

  • शार्दुल ठाकूर

ही निवडसमितीने निवडलेली संभाव्य 21 खेळाडूंची यादी त्यात हर्षा भोगले यांनी रजत पाटीदार आणि उमरान मलिक यांची नावे देखील जोडली आहेत.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.